शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्प रद्दबाबत महसूलमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:57 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे, नांदूरवैद्य तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठका पार पडल्या. मात्र तालुक्यातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याप्रश्नी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी निवेदन त्यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा विरोध कायम : इगतपुरी तालुक्यात गावागावांत बैठका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे, नांदूरवैद्य तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठका पार पडल्या. मात्र तालुक्यातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याप्रश्नी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी निवेदन त्यांच्याकडे करण्यात आली आहे.इगतपुरी तालुक्यातील ज्या गावांमधून ही रेल्वे लाइन जात आहे तेथील शेतकºयांच्या या आधीच शासनाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या आहेत. तसेच इतर जमिनी औद्योगिक वसाहत, धरणे, महामार्ग यासाठी संपादित केल्या आहे. यामुळे आता या रेल्वे प्रकल्पासाठी पुन्हा जमिनी संपादित होणार असल्यामुळे येथील शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.येथील शेतकºयांनी या रेल्वे प्रकल्पाला विरोध कायम ठेवत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. येथील शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या ज्या उर्वरित जमिनी शिल्लक आहेत त्यावरच अनेक शेतकºयांचा उदरनिर्वाह चालत आहे. शासन जर हाती असलेली ही जमीनही रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असेल तर आम्हाला भूमिहीन झाल्याशिवाय पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे व तालुकाध्यक्ष रामदास धांडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करण्यात यावा, असे साकडे घातले.यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळ, शिरीष कोतवाल, अनिल आहेर, जनार्दन माळी, कचरू पाटील शिंदे, बाळासाहेब कुकडे, अरुण गायकर, निवृत्ती कातोरे, कमलाकर नाठे, ज्ञानेश्वर पागेरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात