सातपूर : गुन्हेगारांपासून महिलांचे संरक्षण करण्याची इच्छा व्यक्त करीत सातपूर भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सण पोलीस ठाण्यात साजरा केला. भाजपच्या महिला आघाडी शहर अध्यक्ष रोहिणी नायडू यांच्या नेतृत्वाखाली चिटणीस मंगल खोटरे, प्रदेश उपाध्यक्ष अलका आहिरे, मंदाकिनी नाईकवाडे, सातपूर विभाग अध्यक्ष स्मिता जोशी, काजल गुंजाळ, कुंदा आहेर, कल्पना वाघ आदिंसह महिलांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे, सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे आदि अधिकारी आणि पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. या उपक्र माचे आयोजन शहर चिटणीस मंगल खोटरे यांनी केले. यावेळी राजेंद्र दराडे, रामहरी संभेराव, बंटी नेरे, पांडुरंग खोटरे, राजेंद्र चिखले, शिवाजी शहाणे आदि उपस्थित होते.
संरक्षणाची मागितली ओवाळणी
By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST