शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

तावडे प्रकरणी तक्रारदाराला विचारणा

By admin | Updated: January 24, 2017 00:37 IST

तावडे प्रकरणी तक्रारदाराला विचारणा

नाशिक : नाशिक भेटीवर आलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरतीबाबत दिलेले आश्वासन निवडणूक आचारसंहिता भंग करणारे असल्याची दाखल झालेल्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या प्रशासनाने तावडे यांना क्लिन चिट देतानाच, या संदर्भात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराकडेच पुराव्याची मागणी केली आहे.  गेल्या आठवड्यात तावडे नाशिक भेटीवर आले होते त्यावेळी संस्थाचालकांनी त्यांची भेट घेऊन शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे निवेदन सादर करून चर्चा केली असता, शिक्षक भरतीबाबत निवडणूक आचारसंहितेबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन तावडे यांनी त्यांना दिले. त्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमात वृत्त प्रसिद्ध होताच, पदवीधर मतदारसंघातील उमेदवार कॉ. राजू देसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्ह्यात पदवीधर, जिल्हा परिषद, महापालिका व पंचायत समितीची निवडणूक आचारसंहिता सुरू असताना शिक्षक मतदारांना आमीष दाखविण्यासाठी तावडे यांनी सदरचे आश्वासन देऊन आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे देसले यांचे म्हणणे होते. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी नाशिकच्या प्रांत अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता, तावडे यांच्या वक्तव्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुराव्यासाठी त्यांनी संस्थाचालकांचे जबाबही घेतले. (प्रतिनिधी)