शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

‘आशा’ मुख्यमंत्र्यांना देणार १५ हजार गुलाबपुष्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:06 IST

महाराष्ट्रात सुमारे ९० हजार आशा व गटप्रवर्तक आरोग्य विभागात कार्यरत असून, या सर्वांनी गेल्या पंधरवड्यापासून आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून कामबंद आंदोलन पुकारले असून, अद्याप सरकारने या राज्यव्यापी आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाशिकमधील आशा व गटप्रवर्तकांनी सोमवारी (दि.१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर चेहऱ्यावर काळे कपडे बांधून मूक निदर्शने केली.

नाशिक : महाराष्ट्रात सुमारे ९० हजार आशा व गटप्रवर्तक आरोग्य विभागात कार्यरत असून, या सर्वांनी गेल्या पंधरवड्यापासून आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून कामबंद आंदोलन पुकारले असून, अद्याप सरकारने या राज्यव्यापी आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाशिकमधील आशा व गटप्रवर्तकांनी सोमवारी (दि.१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर चेहऱ्यावर काळे कपडे बांधून मूक निदर्शने केली.तसेच संवाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांना गुलाबपुष्प देऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.शनिवारी नाशिक शहरात कृतीसमितीच्या यावेळी अर्चना गडाख, विजय दराडे, सायली महाले, ज्योती गोडसे, अरुणा आव्हाड, सुरांजे गायत्री, शीतल खत्री, धनश्री गाडे, पौर्णिमा भगत, कावेरी बेंडकुळी, मीना अत्रे, प्रणाली सोनवणे, संगीता वाघ, सरला बोरसे आदी शेकडो आशा व गटप्रवर्तकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने केली. तालुकास्तरावर महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मूक निदर्शने करीत आशा व गट प्रवर्तकांना मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी केली असून, यात मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधील रोड शो दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक १५ हजार गुलाबपुष्प देऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालणार आहेत.शासन निर्णय जाहीर करण्याची मागणीआशा व गटप्रवर्तकांतर्फे राज्यभर मोर्चे, जेलभरो, आंदोलन, आमदार खासदारांना निवेदन, राज्यातील मंत्र्यांना संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहेत. आशा व गटप्रवर्तकांना राज्य शासनाने तीनपट मानधन वाढीचे दिलेले आश्वासन निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, तसेच यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करावा या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक