शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आशा कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:05 IST

मालेगाव : शहरातील १४० आशा कर्मचाºयांचे १२ महिन्यांचे रखडलेले वेतन अदा करावे या मागणीसाठी संतप्त आशा कर्मचाºयांनी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. येत्या दोन दिवसात रखडलेले वेतन अदा केले जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्त धायगुडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देआश्वासन मनपा आयुक्त धायगुडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे

मालेगाव : शहरातील १४० आशा कर्मचाºयांचे १२ महिन्यांचे रखडलेले वेतन अदा करावे या मागणीसाठी संतप्त आशा कर्मचाºयांनी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. येत्या दोन दिवसात रखडलेले वेतन अदा केले जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्त धायगुडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.लसीकरण व इतर आरोग्यसेवा पुरविण्याचे काम शहरातील १४० आशावर्कर करीत असतात. त्यांना दोन हजार रुपये वेतन आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी महापौर रशीद शेख यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी आंदोलनकर्त्या महिलांनी महापौरांची भेट घेऊन काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या आंदोलनात चारूशिला शिंदे, शोभा सूर्यवंशी, माधुरी शिंदे, रूपाली देशमुख, सुरेखा परदेशी, सविता जाधव आदींसह आशावर्कर सहभागी झाल्या होत्या.महापौरांनी दोन दिवसात वेतन अदा करू, असे आश्वासन दिले होते; मात्र दोन दिवस उलटूनही रखडलेले वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या आशावर्करने मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी आयुक्त धायगुडे यांनी उपायुक्त कापडणीस रजेवर आहेत ते आल्यानंतर धनादेशवर स्वाक्षरी करतील व वेतन अदा होईल, असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.