नाशिक : आकाश हे सर्वांचे आहे. या आकाशातील ग्रह व तारे यांचा सर्वांना परिचय व्हावा, त्याविषीय माहिती मिळावी या उद्देशाने आर्यभट्ट आकाश निरीक्षण केंद्रातर्फे रविवारी (दि.२) नाशिककरांना दूर्बिणीद्वारे चंद्रदर्शन घडविण्यात आले. पंडित कॉलनीतील आर्यभट्ट आकाश निरीक्षण केंद्राचे संचालक रमाकांत देशपांडे यांनी केंद्रात येणाऱ्या लहान-मोठे सर्व खगोलप्रेमींना १००० एक्स दूर्बीणच्या साह्याने चंद्राचे दर्शन घडविले. यावेळी त्यांनी उपस्थिताना चंद्रावरील पर्वत व त्यांच्या सावल्या, ज्यालामुखी दाखविताना त्यांच्याविषयी सखोल माहिती दिली. पृथ्वीपासून सुमारे तान लाख ८६ हजार किमी दूर असलेल्या चंद्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी शहरातील विविध भागांतून नागरिकांनी आर्यभट्ट आकाश निरीक्षण केंद्राला भेट देऊन आपल्या पाल्यांना चंद्रदर्शनाची संधी मिळवून दिली.