घोटी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी (दि. ११) दुपारी ४ वाजेदरम्यान इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात दाखल झाले असून, येथील निसर्गरम्य परिसरात ते दहा दिवस विपश्यना करणार आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यापूर्वीही विविध ठिकाणी विपश्यना केली आहे. इगतपुरी येथे ते प्रथमच आले आहेत. सोमवारी दिल्लीहून विमानाने मुंबई येथे त्यांचे आगमन झाले. मुंबई विमानतळापासून वाहनाने प्रवास करत दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांचे इगतपुरी येथे आगमन झाले.धम्मगिरीच्या वतीने व्यवस्थापक सावलाजी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, नगरसेवक नईम खान, रिपाइंचे सुनील रोकडे आदी उपस्थित होते.
अरविंद केजरीवाल यांची इगतपुरीत विपश्यना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:10 IST