शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

कलासंवर्धन करणारी संस्कारभारती टिळक भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:18 IST

हित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावर काम संस्था म्हणजे संस्कारभारती. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात संस्कारभारतीचा टिळकभाग म्ाहिलांसाठी निरनिराळे उपक्रम राबवित आहे. कला हे मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे आणि प्रत्येकाला आकर्षित करण्याचे सामर्थ्य कलेमध्ये आहे. कलाकार आणि कलासाधक यांचे संघटन व्हावे म्हणून संस्कारभाती संस्था कार्यरत आहे.

परिचय महिला संस्थांचाहित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावर काम संस्था म्हणजे संस्कारभारती. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात संस्कारभारतीचा टिळकभाग म्ाहिलांसाठी निरनिराळे उपक्रम राबवित आहे. कला हे मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे आणि प्रत्येकाला आकर्षित करण्याचे सामर्थ्य कलेमध्ये आहे. कलाकार आणि कलासाधक यांचे संघटन व्हावे म्हणून संस्कारभाती संस्था कार्यरत आहे. भारतीय संस्कृती व कलेचे संवर्धन व्हावे, कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, कलाकारांना मार्गदर्शन व्हावे व लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी ही संस्था निरनिराळे उपक्रम राबवित असते. त्यात नववर्ष गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दिवाळी परिवार मेळावा, भरतमुनी जयंती, भारतमाता पूजन असे निरनिराळे उपक्रम दरवर्षी राबविले जातात. गुढीपाडव्याला रांगोळ्यांची सजावट करून मंगलमय वातावरणात नववर्षाचे स्वागत केले जाते. सकाळी पारंपरिक वेशात शोभायात्रा काढली जाते. त्यात आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. गुरुपौर्णिमेला गुरु-शिष्य परंपरा आणि गुरुंविषयी पुज्य भाव प्रकट करणारे गायन, वादन, नृत्य आदि विविध कार्यक्रम सादर केले जातात. शिष्य-गुरुंना कार्यक्रमाद्वारे वंदन करतात. गुरुंचा सन्मान केला जातो. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुंच्या घरी जाऊन रांगोळी काढून आदर व्यक्त केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णावर आधारित एखादा कार्यक्रम घेतला जातो. दिवाळीसारख्या सणाला सदस्य व हितचिंतकांचे स्नेहसंमेलन भरविले जाते. यावेळी वेगवेगळे कलाविष्कार सादर केले जातात. तर नाट्यशास्त्राचे प्रणेते भरतमुनी यांचे स्मरण करुन कलाविष्कार सादर केला जातो. संगीत नाटकातील प्रवेश, त्यावर आधारित गाणी आणि नांदी असा सुरेख कार्यक्रम असतो. प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतमातेचे पूजन केले जाते. याशिवाय संस्कारभारतीकडून अखिलभारतीय नृत्यधारा, रांगोळी शिबिरे, मंगळागौरीचे खेळ, चित्रकला वर्ग, मासिक संगीत सभा यांसह इतरही अनेक कार्यक्रम सादर केले जातात. या संस्कारभारती संस्थेत प्राची कलकर्णी, रागिणी किणीकर, मेघना बेडेकर, देवयानी लेले, नूपुर सावजी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सक्रिय सहभाग देत आहेत.