शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील फडणीस ग्रुपच्या संचालकास अटक

By admin | Updated: April 21, 2017 02:01 IST

नाशिक : कोट्यवधी रुपयांची फसवणूकप्रकरणी फडणीस ग्रुप अ‍ॅण्ड कंपनीज् व फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विनय फडणीस यांना आर्थिक गुन्हे शाखेचे विक्रोळी परिसरातून अटक केली़

नाशिक : गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा अधिक व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक घेत फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या पुण्यातील नामांकित फडणीस ग्रुप अ‍ॅण्ड कंपनीज् व फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विनय प्रभाकर फडणीस यांना नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे बुधवारी (दि़१९) सायंकाळी मुंबईतील विक्रोळी परिसरातून अटक केली़ फडणीस यांना न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश एम. एस. पठाण यांनी २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.फडणीस ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेल्या नाशिकच्या गुंतवणूकदारांनी यापूर्वीही अनेकदा संचालकावंर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती़ यांनतर पोलीस आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर फडणीस यांनी पैसे परत करण्याचे केवळ आश्वासन दिले़ यामुळे काही गुंतवणूकदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर नाशिक शहरातील मुंबईनाका, इंदिरानगर, सरकारवाडा आदि पाच पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक व एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले़फडणीस ग्रुपच्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (दि़ १८) पोलीस आयुक्त, उपायुक्त यांची भेट घेतली, तर काहींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कार्यवाही होत नसल्याची तक्रार केली होती़ या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक हेमंत सावंत व विजयकुमार पन्हाळे यांच्या पथकाने बुधवारी रात्री विक्रोळी परिसरातून अटक केली़ जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ अजय मिसर यांनी न्यायालयात फडणीस ग्रुपने नाशिकमधील गुंतवणूकदारांची ६० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले, तर गुंतवणूकदारांतर्फे अ‍ॅड़ जयदीप वैशंपायन यांनी फडणीस ग्रुपच्या संचालकांनी पैसे परत करण्याचे खोटे आश्वासन दिल्याचे न्यायालयास सांगितले़दरम्यान, सुधीर नागेश हिंगे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चौथा गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये दहा कोटी ४३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे़ दरम्यान, विनय फडणीस यांना गुरुवारी (दि़२०) न्यायालयात हजर करण्यात आले़ त्यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ यावेळी न्यायालयात हजर असलेल्या गुंतवणूकदारांनी विनय फडणीस यांच्या अटकेबाबत समाधान व्यक्त केले असून, पोलिसांनी कारवाईस उशीर लावल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)