शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट चोरणाऱ्या टोळक्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:21 IST

नाशिक : शहरातील विविध ठिकाणांहून महागड्या बुलेट दुचाकींची चोरी करणाºया त्रिकुटास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़

ठळक मुद्देसाडेतीन लाख रुपये किमतीच्या तीन बुलेटही जप्तदुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश

नाशिक : शहरातील विविध ठिकाणांहून महागड्या बुलेट दुचाकींची चोरी करणाºया त्रिकुटास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़ प्रदीप कासार (रा. शेवगे दारणा, ता. नाशिक), बाळासाहेब कासार (रा. शेवगे दारणा) व वैभव ढेरिंगे (रा. लहवित, ता. नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीच्या तीन बुलेटही जप्त करण्यात आल्या आहेत. शहरातून महागड्या बुलेट दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण चांगलेच वाढल्याने या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते़ शहर गुन्हे शाखेतील युनिट दोनच्या पथकातील पोलीस शिपाई गणेश सानप यांना या त्रिकुटाबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, विजय लोंढे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, कर्मचारी योगेश सानप, बाळा नांद्रे, देवकिसन गायकर, विजय पगारे, रमेश घडवजे, संजय ताजने यांनी सापळा रचून संशयिताना शेवगे दारणा तसेच लहवित येथून अटक केली. पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पुणे शहरातील फरासखाना, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथूून चोरी केलेल्या साडेतीन लाख रुपये किमतीच्या तीन बुलेट चोरल्याची कबुली दिली़ हे तिघेही सराईत चोरटे असून त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़दरम्यान, या टोळीचा सूत्रधार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत़