शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीवसुलीप्रकरणी मनसेच्या सत्यम खंडाळेसह वकिलास अटक ; तीस लाखांची मागितली होती खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 20:36 IST

खंडाळे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत (दि.१५) पोलीस कोठडी सुनावली. वकीलपत्र काढून घेतल्याचा राग मनामध्ये धरून धमकावणारे अ‍ॅड. राजेंद्र खंदारे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देतुपसाखरे यांना दाव्यापोटी मोठी रक्कम मिळाल्याने संशयित वकील खंदारे यांनी तुपसाखरे यांच्याकडे तीस लाख रूपयांची मागणी लोकअदालतीत सर्व वाद मिटवून सदर जमीन १ कोटी १० लाख रूपयात समझोता करून घेतला.

नाशिक : हिरावाडी परिसरातील रहिवाशाला शेतजमिनिच्या व्यवहारापोटी भ्रमणध्वनीवरून धमकावत तीस लाख रुपयांची खंडणी वसूलीप्रकरणी मनसेचा सरचिटणीस व शिवमुद्रा मित्र मंडळाचा अध्यक्ष सत्यम खंडाळे यास पंचवटी पोलिसांनी गुरूवारी (दि.१२) अटक केली. खंडाळे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत (दि.१५) पोलीस कोठडी सुनावली. वकीलपत्र काढून घेतल्याचा राग मनामध्ये धरून धमकावणारे अ‍ॅड. राजेंद्र खंदारे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या शेतजमिनीच्या व्यवहारापोटी खंडणी मागणाºया खंडाळे व एका वकीलावरा याबाबत हिरावाडीरोड पार्वती पॅलेस येथे राहणाºया संतोष शांताराम तुपसाखरे यांनी तक्रार दिली होती. यांनी तक्र ार दाखल केली आहे. तुपसाखरे यांच्या वडिलोपार्जित असलेल्या १८एकर जमिनीविषयी 1992 साली दिवाणी दावा दाखल केला होता. सदरचा दावा चालविण्यासाठी राजेंद्र खंदारे यांना वकिलपत्र दिलेले होते. या दाव्याचा १९९६ साली निकाल लागला. त्यावेळीच तुपसाखरे यांच्या वडिलांनी खंदारे यांना संपूर्ण रक्कम दावा चालविल्याबद्दल अदा केली. तक्र ारदार व त्यांच्या नातेवाईकांनी १२ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या लोकअदालतीत सर्व वाद मिटवून सदर जमीन १ कोटी १० लाख रूपयात समझोता करून घेतला. त्यानंतर खंदारे यांच्याकडून वकीलपत्र काढून घेण्यात आले.तुपसाखरे यांना दाव्यापोटी मोठी रक्कम मिळाल्याने संशयित वकील खंदारे यांनी तुपसाखरे यांच्याकडे तीस लाख रूपयांची मागणी करून पैसे न दिल्यास खोटया गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी दिली होती. पंचवटी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिनेश बर्डेकर व पोलीस उपनिरिक्षक योगेश उबाळे यांनी संशियत खंडाळे व खंदारे यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास उबाळे करीत आहेत.