शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

दंगलीत वृद्धाची हत्या करणा-या आरोपीस अटक

By admin | Updated: February 24, 2017 02:39 IST

पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपीला अकोट शहर पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी अटक केली.

नाशिक : गेल्या दीड दशकापासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला जिल्हा परिषदेतून अखेर पायउतार व्हावे लागले आहे. सर्वांत मोठा पक्ष म्हणून शिवसेनेने मुसंडी मारत २५ जागा मिळवल्याने भाजपाबरोबर युती केल्यास सेनेला सत्ता स्थापन करता येणार आहे. भाजपास पंधरा जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी १९ जागा मिळून दुसऱ्या स्थानी असून, कॉँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले. मनसेचा धुवा उडाला असून, माकपाला तीन जागा लाभल्या आहेत.शिवसेनेचे सर्वात धक्कादायक निकाल मालेगाव, नाशिक व निफाड तालुक्यांत लागले आहेत. मालेगाव येथून सातपैकी झोडगे, वडनेर खाकुर्डी या अवघ्या दोन गटांतून शिवसेनेला यश मिळाले असून, निमगाव, कळवाडी, सौंदाणे, दाभाडी व रावळगाव गटात भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. निफाड तालुक्यातील दहा गटांपैकी पाच गटांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने विजय मिळविला. शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांना हा धक्का मानला जात आहे. चांदोरी, देवगाव, पालखेड, सायखेडा, विंचूर गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसने, तर उगाव, पिंपळगाव व कसबे सुकेणे गटात शिवसेनेने विजय मिळवला. सिन्नर तालुक्यातील सहापैकी पाच जागांवर शिवसेनेने मुसंडी मारत नगरपालिका निवडणुकीची परंपरा कायम राखली. देवपूर हा एकमेव भाजपाचा गट वगळता चास, नायगाव, ठाणगाव, मुसळगाव व नांदुरशिंगोटे गटातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, शिरसाटे, खेड गटातून शिवसेनेच उमेदवार निवडून आले. नाशिक तालुक्यात शिवसेनेची जबरदस्त पीछेहाट होत पळसे, गोवर्धन, गिरणारे गट राष्ट्रवादीच्या ताब्यात तर एकलहरे गटातून सेनेचे बंडखोर शंकर धनवटे अपक्ष म्हणून निवडून आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरीतून कॉँग्रेस, ठाणापाडातून माकपा, तर हरसूल गटातून अपक्ष उमेदवार निवडून आले. सुरगाणा तालुक्यातून भवाडा व गोेंदुणे गटातून माकपा, तर हट्टी गटातून भाजपाचे उमेदवार निवडून आले. कळवण तालुक्यातील कनाशी, मानूर व खर्डेदिगर गटातून राष्ट्रवादी तर अभोणा गटातून कॉँग्रेसने जागा जिंकली. दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी, कसबेवणी, मोहाडी, खेडगाव येथून शिवसेना, तर उमराळे व कोचरगाव गटातून कॉँग्रेसने विजय मिळविला. देवळा तालुक्यातून लोहणेर येथून भाजपा, तर उमराणे व वाखारी गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. बागलाण तालुक्यातून नामपूर, वीरगाव, ठेंगोडा, ब्राह्मणगाव गटातून भाजपा, तर जायखेडा गटातून राष्ट्रवादी व ताहाराबाद गटातून अनुक्रमे राष्ट्रवादी व कॉँग्रेसने जागा जिंकली. पठावे दिघर गटातून अपक्ष आदिवासी क्रांतिसेनेने जागा जिंकली. (प्रतिनिधी)