लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : हातात तलवार घेऊन गोरक्षनगर परिसरात दहशत निर्माण करणारा संशयित आकाश दिलीप खैरणार (वय १९, रा.उमादर्शन सोसा.राजमाता मंगल कार्यालयाजवळ ) यास म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर परिसरात गुरुवारी(दि़१९) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक तरुण हातात धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून संशयित खैरनारला ताब्यात घेत त्याच्याकडील धारदार तलवार जप्त केली़ तसेच त्याच्याकडील दुचाकीही (एमएच १५ डीआर ५७९४) पोलिसांनी जप्त केली आहे़ या प्रकरणी त्याच्यावर म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
गोरक्षनगरमध्ये दहशत पसरविणाऱ्यास अटक
By admin | Updated: May 19, 2017 17:04 IST