पंचवटी : मागील भांडणाची कुरापत काढून सहकारी वेटरचा लाकडी दांडक्याने खून करणारा संशयित उदय भोला भारती (रा. प्रताप हॉटेल, आडगाव शिवार) यास आडगाव पोलिसांनी मालेगावमधून ताब्यात घेतले आहे़ रविवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल प्रतापमध्ये किरकोळ कारणावरून संशयित भारतीने सहकारी वेटर अनिल गोपाल प्रसाद गुप्ता (३२, रा. पटणा, बिहार) याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून त्याचा खून केला होता़ याप्रकरणी प्रेम पासवान (२६) फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, एस. एस. होनमाने यांनी तपास करून संशयितास सोमवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास मालेगावमधून ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)
वेटरचा खून करणाऱ्या संशयितास अटक
By admin | Updated: January 4, 2016 23:59 IST