शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी देशपातळीवरून ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था

By admin | Updated: January 23, 2015 02:02 IST

आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी देशपातळीवरून ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था

नाशिक : भारताच्या प्राचीन वेदात असलेल्या आयुर्वेदाच्या परंपरेला देशात आणि जगभरात पोहोचविण्यासाठी केंद्रशासन प्रयत्न करीत आहे. अ‍ॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी देशपातळीवरून ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था उभारण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पहिले आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.पंचवटीतील आरोग्य सेवा संघाच्या आरोग्य शाळा रुग्णालयाच्या वतीने पंचकर्म कक्षाचे उद््घाटन श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, संघाचे अध्यक्ष मामासाहेब राजपाठक तसेच अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.ऋषी-मुनी आणि वेदांत सांगितलेले आयुर्वेद ही आपली परंपरा आहे. परंतु परकियांनी आक्रमण करून अन्य परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तद्वतच स्वातंत्र्यानंतर या विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता केंद्र सरकारने आपली परंपरा असलेले आयुर्वेद पुढे नेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे केंद्रात प्रथमच हा विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाच्या विविध योजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरीव तरतूद करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात आयुर्वेदाच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे, असे सांगून नाईक यांनी आयुर्वेद आपल्या देशातील असतानादेखील विदेशी लोक त्याचे महत्त्व सांगतात. नाकर्तेपणामुळे उगम असलेल्या देशातच आयुर्वेदाचे महत्त्व कमी झाले आहे. आयुर्वेद टिकवून ठेवण्यासाठी देशातच आयुर्वेदाचे महत्त्व वाढले पाहिजे. अ‍ॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी केंद्र, राज्य आणि ग्रामपातळीपर्यंत व्यवस्था उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून सर्वरोगोपचार मिळू शकेल तसेच औषध निर्मितीतून गरिबांना परवडणारी उपचार व्यवस्था निर्माण होऊ शकेल, असेही नाईक म्हणाले.