शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

दीड हजार विद्यार्थी रस्त्यावर

By admin | Updated: September 15, 2016 00:00 IST

घोटी : भुयारी मार्गाच्या मागणीसाठी आंदोलन

घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील टाके घोटी शिवारात असलेल्या कै. पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे आज सकाळी अपघाती निधन झाल्यानंतर महाविद्यालयासमोर भुयारी महामार्ग निर्माण करावा, या मागणीसाठी आज महाविद्यालयातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी घोटी टोलनाक्यावर अघोषित रास्ता रोको आंदोलन करीत महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प केली. दरम्यान, याबाबत टोलनाका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.इगतपुरी येथील कै. पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अजय बाजीराव नाठे व नीलेश पांडुरंग लहाने यांचा आज सकाळी टाके घोटी शिवारात अपघात होऊन यातील संजय नाठे याचा मृत्यू झाला.दरम्यान, याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असुरक्षित असल्याने महाविद्यालयासमोर भुयारी मार्ग व सर्व्हिस रोड निर्माण करावा अशी मागणी सातत्याने करूनही महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या महाविद्यालयातील शिक्षक वर्ग व सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला.याबाबत आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास टाके घोटी येथील महाविद्यालयापासून मूक मोर्चा काढीत महामार्ग प्राधिकरणाच्या गचाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. हा मोर्चा घोटी येथील टोलनाक्यावर आल्यानंतर मोर्चात सहभागी सुमारे दीड हजार विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हा रस्ता रोखून धरीत महामार्ग वाहतुकीकरिता बंद केला. यामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या.दरम्यान, टोलनाका प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेत आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. भुयारी महामार्ग व सर्व्हिसरोड ही बाब महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असल्याने याबाबत संबंधित खात्याला कळविले जाईल, अशी मध्यस्थी घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी केल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात महाविद्यालयाचे प्रा. व्ही. जे. मेदने, पी. जी. खळे, पी. एन. पाटील, डी. एन. पाटील, अहेर, कार्यालयीन अधीक्षक मते, कापडी, मगर, काळे, थेटे आदिंसह सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. (वार्ताहर)