शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वासाठी सेना-भाजपाची ‘सत्त्वपरीक्षा’

By admin | Updated: February 19, 2017 00:35 IST

मतविभागणीचा फटका; नाराजांचा अपप्रचार भोवणार

नाशिक : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आजवर नाशिकरोडची ओळख सांगितली जाते. परंतु यापुढील काळात शिवसेनेला अंतर्गत गृहकलहाचा सामना करावा लागणार आहे. भाजपाचीही परिस्थिती याहून वेगळी नाही. दोन्ही पक्षांतील निष्ठावान आणि नाराजांनी चालविलेला अपप्रचार तसेच दिग्गजांच्या बंडखोरीमुळे या दोन्ही पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय काही प्रभागांचा अपवाद वगळता उमेदवारांनी पॅनलपेक्षा स्वकेंद्रित प्रचार सुरू केल्यामुळेही नाशिकरोडचा ‘सत्तासंघर्ष’ वर्चस्व टिकविण्यासाठीच रंगणार असल्याचे चिन्ह आहे.  यंदाची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षांसाठी पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. तिकीट वाटपानंतर शिवसेना आणि भाजपा यांना स्वकीयांकडूनच होणारा थेट विरोध आणि कॉँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये असलेला कार्यकर्त्यांचा दुष्काळ या पार्श्वभूमीवर या प्रमुख राजकीय पक्षांना अस्तित्वाची चिंता नक्कीच असणार आहे. मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचे सात नगरसेवक असताना भाजपाने पोट निवडणुकीत मुसंडी मारत नगरसेवकांची संख्या दोनवरून चारवर नेली. त्यामुळे नाशिकरोडमध्ये सेनेला भाजपा टक्कर देऊ शकतो अशी परिस्थिती आहे. मात्र युतीचे संबंध तुटल्यानंतर नाशिकरोडच्या गडावर कोण झेंडा रोवतो यासाठी दोहोंमध्ये चुरस असेल. भाजपा आणि सेनेने नाशिककरोडच्या सर्वच जागांवर उमेदवार दिल्याने खरी लढत या दोन पक्षांमध्येच होणार असल्याचे उघड आहे.  नाशिकरोड मध्ये शिवसेनेचे- ७, राष्ट्रवादी- ३, कॉँग्रेस-२, मनसे- ४, भाजपा-४, रिपाइं-२ आणि अपक्ष-१ असे बलाबल आहे. परंतु बदलेली प्रभाग रचना आणि मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाल्यामुळे सर्वच पक्षांचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे या साऱ्यांनाच शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण असल्याने पॅनल फुटल्याचे प्रकार घडले आहेत. उघडपणे ही बाब कुणी मान्य करीत नसले तरी पॅनलचे उमेदवार आता स्वतंत्र प्रचारयंत्रणा राबवित असल्याने ही बाब समोर आली आहे.  अशा वातावरणात शिवसेना, भाजपामधील बंडखोर व नाराजांनी घेतलेल्या भूमिकेमुळेदेखील उमेदवारांचा कस लागणार आहे. बदललेल्या प्रभाग रचनेचा लाभ नेमका कुणाला होतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. आयात उमेदवार, पक्षांतर केलेल्यांची वर्णी आणि स्थानिक उमेदवार यावर प्रचारयंत्रणा राबविली जात आहे. नाराजांचा पक्षविरोधी प्रचार एकीकडे सुरू असताना पॅनलचे उमेदवार मात्र एकत्रित नसल्याने राजकीय पक्षांची दोलायमान परिस्थिती समोर आली आहे. नाशिकरोडमध्ये माजी आमदार बबन घोलप हाच शिवसेनेचा चेहरा राहिला आहे. मात्र त्यांनी त्यांच्या दोन्ही कन्यांना रिंगणात उतरविल्याने आणि काहींच्या माथी बदलेला प्रभाग मारल्याने नाराजीचा सूर लपून राहिलेला नाही. माजी आमदार घोलप यांच्याविषयी कधीही विरोधाचा सूर नाशिकरोडमध्ये ऐकावयास मिळाला नाही, परंतु यंदा घोलप यांनाच धडा शिकविण्याचा ‘पण’ काहींनी केला आहे. माजी आमदार कन्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सेनेच्या इतर उमेदवारांवर सोपविण्याच्या राजकारणामुळेही काही सेना उमेदवार नाराज असल्याचे बोलले जाते.  उमेदवारी देताना सेना-भाजपाने आयारामांना दिलेल्या संधीमुळे दुखावलेले आता अपक्षांच्या प्रचारात गुंतल्याने पक्षांनाही काहीसा घाम फुटला आहे. राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसकडून यंदा फारसे आव्हान नाही. मात्र मोजक्याच जागेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे निदान काँग्रेसला आणि राष्ट्रवादीलाही किमान दोन ते तीन जागांची हमी वाटत आहे. मात्र त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांनाच सांभाळावी लागत आहे. पक्ष पातळीवर स्थानिक नेतेदेखील नाशिकरोडकडे फिरकले नाहीत.  गेल्या पंचवार्षिकला मनसेचे चार नगरसेवक असतानाही यंदा त्यांना चर्चेतील चेहरा लाभू नये यातूनच त्यांची हतबलता प्रकट होते. मनसेला जुने सर्वच सोडून गेल्याने नव्यांच्या भरवशावर निवडणुकीत उतरेल्या मनसेला यश लाभण्याची शक्यता अतिशय धुसर आहे. इतर पक्षांना चमत्काराचीच अपेक्षा असेल मात्र सेना-भाजपाला काही प्रभागांचा अपवाद वगळता पॅनल फुटीचा मोठा परिणाम होण्याचीही शक्यता आहे. सर्वच पक्ष आणि अपक्षांनीही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात जोर लावल्याने काही ठिकाणी अपक्षही धक्कादायक निकाल देऊ शकतात, असे एकूण चित्र आहे.