शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सेना, भाजपाला बंडखोरांचा धोका

By admin | Updated: February 11, 2017 00:11 IST

मनसे सावध : चार नगरसेवकांच्या नशिबाचा होणार फैसला

नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोशिवसेना व भाजपात उमेदवारीवरून झालेली रस्सीखेच, परिणामी भाजपासमोर बंडखोराने उभे केलेले आव्हान तर सेनेच्या इच्छुकाने ऐनवेळी भाजपाकडून घेतलेली उमेदवारी, कॉँग्रेस व राष्ट्रवादीची पराभूत मानसिकता, मनसेचे तेच तेच चेहरे प्रभाग क्रमांक २५ मधून आपले भवितव्य आजमावित आहेत. चार जागांसाठी चाळीस उमेदवार आहेत. शिवसेनेचे दोन व मनसेचे दोन असे चार विद्यमान नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या प्रभाग क्रमांक २५ मधील राजकीय परिस्थिती संमिश्रावस्थेत आहे. प्रभागातील ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या गटातून शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर, भाजपाकडून मुरलीधर भामरे, मनसेकडून अ‍ॅड. अतुल सानप या तिघांमध्येच प्रमुख लढत आहे. कॉँग्रेस आघाडीकडून या गटात उमेदवार देण्यात आलेला नाही, त्यामुळे सेनेचे बडगुजर विरुद्ध भाजपाचे भामरे व मनसेचे सानप यांच्यातच ही लढत आहे. तसे पाहिले तर भामरे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असून, त्यांनी तसेच मनसेचे सानप यांनी यापूर्वी बडगुजर यांच्याशी दोन हात केले आहेत व त्यात ते दोघेही अपयशी ठरले आहेत. परंतु पुन्हा हे दोघेही रिंगणात उतरले आहेत. ‘ब’ सर्वसाधारण महिला गटातून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक व सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली असून, मनसेकडून सावित्री रोजेकर व भाजपाकडून पुरस्कृत अर्चना किरण शिंदे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. रोजेकर यांनी गेल्या निवडणुकीतही मनसेकडून उमेदवारी केली होती, तर अर्चना शिंदे यांचे पती किरण हे शिवसेनेकडून या प्रभागातून इच्छुक होते, परंतु पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करून पत्नी अर्चना हिच्यासाठी उमेदवारी घेतली. त्यामुळे या प्रभागात सेना विरुद्ध सेना अशीच लढत आहे.‘ड’ सर्वसाधारण खुल्या गटातून एकूण अकरा उमेदवारांनी एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. सेनेकडून श्यामकुमार साबळे, मनसेकडून विद्यमान नगरसेवक अनिल मटाले, भाजपाकडून संतोष अरिंगळे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून कैलास पाटील, राष्ट्रवादीकडून योगेश गांगुर्डे, भारतीय संग्राम परिषदेकडून नितीन राजेंद्र अमृतकर, बहुजन समाज पक्षाकडून विशाल लक्ष्मण गांगुर्डे, अपक्षांमध्ये भाजपाचे बंडखोर प्रकाश अमृतकर, आशिष हिरे, तुषार साळुंके, तुषार मटाले यांचा समावेश आहे. भाजपाचे प्रकाश अमृतकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.