शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपातच चुरस

By admin | Updated: February 19, 2017 01:33 IST

अटीतटीची लढत : आजी-माजी मंत्र्यांची लागणार कसोटी

 शफीक शेख मालेगावतालुक्यातील रावळगाव गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्यामुळे यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत या गटात काट्याची टक्कर होत आहे. शिवसेना व भाजपाच्या दोघा उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. तसेच रिपाइं गवई गटासह अपक्ष उमेदवारदेखील नशीब आजमावत आहेत. या मातब्बरांच्या लढाईकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. शिवसेनेने रमेश अहिरे यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपाने शेतकी संघाचे चेअरमन समाधान हिरे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. कॉँग्रेस व राकॉँचे अशोक शिरोळेदेखील निवडणूक रिंगणात आहेत. रिपाइंचे प्रशांत गरुड यांच्या उमेदवारीने तिरंगी होणारी लढत अंतिम टप्प्यात दुरंगीच होणार आहे. शिवसेना व भाजपाच्या दोघा उमेदवारांमध्ये टशन दिसून येत आहे. पंधरा वर्षांपासून रावळगाव गटावर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. रावळगाव गणातील पंचायत समितीचे उमेदवार शरद कासार यांना पंचायत समितीचे उपसभापतिपदही बहाल केले होते. तर विद्यमान सदस्य सुरेश पवार यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या गटाला खिंडार पाडण्यासाठी भाजपाने हिरे गटाचे कट्टर समर्थक व शेतकी संघाचे विद्यमान चेअरमन हिरे यांनाच रिंगणात उतरविल्यामुळे शिवसेनेला मातब्बर उमेदवाराचा सामना करावा लागत आहे. रिपाइंचे प्रशांत गरुड रिंगणात उतरल्यामुळे ही लढत तिरंगी झाली होती. संजय जाधव हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सेनेची साथ सोडली आहे. त्यांची अपक्ष म्हणून असलेली लढत सेनेच्या मतांचे विभाजन करण्याची शक्यता आहे. प्रशांत गरुड व संजय जाधव यांची हिरे आणि अहिरे यांना डोकेदुखी ठरत आहे. प्रशांत गरुड हे स्थानिक उमेदवार आहेत. सेनेसाठी ही अस्तित्वाची लढत असून, राज्यमंत्री दादा भुसे यांना या गटात कार्यकर्त्यांसह ठाण मांडून बसावे लागत आहे. भाजपानेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची प्रचारसभा घेतली असून, सेनेला मात्र स्थानिक नेतृत्वावरच प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे. पंधरा वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या गटावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच उमेदवारांना कंबर कसावी लागत आहे, तर हातातून गेलेला गट पुन्हा मिळविण्यासाठी भाजपाने सर्व शक्ती पणाला लावली आहे.  भाजपा-सेनेच्या लढाईत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने मैदानात उतरविलेले उमेदवार अशोक शिरोळे हे तळवाडे येथील रहिवासी आहेत. कॉँग्रेससाठीसुद्धा ही अस्तित्वाची लढाई असल्याने हिरे-अहिरे यांच्यासमोर शिरोळे यांचे मोठे आव्हान असल्याने सेना-भाजपा यांची गुंतागुंत वाढली आहे.