शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची आक्रमकता भाजपाला डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:15 IST

महापालिकेच्या महासभांमध्ये दरवेळी शिवसेनेकडून घेतली जाणारी आक्रमक भूमिका सत्ताधारी भाजपासाठी डोकेदुखी ठरली आहे. सेनेची ही आक्रमकता मोडून काढण्यासाठी आता भाजपातील ‘थिंक टॅँक’ पुढे आला असून, सेनेला आव्हान देण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे, यापुढील महासभांमध्ये भाजपा-सेना या उभयतांमध्ये संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : महापालिकेच्या महासभांमध्ये दरवेळी शिवसेनेकडून घेतली जाणारी आक्रमक भूमिका सत्ताधारी भाजपासाठी डोकेदुखी ठरली आहे. सेनेची ही आक्रमकता मोडून काढण्यासाठी आता भाजपातील ‘थिंक टॅँक’ पुढे आला असून, सेनेला आव्हान देण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे, यापुढील महासभांमध्ये भाजपा-सेना या उभयतांमध्ये संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महापालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपाला प्रत्येक विषयावर लक्ष्य करण्याची संधी आजवर शिवसेनेने सोडलेली नाही. मार्च २०१७ पासून झालेल्या सर्वच महासभांमध्ये शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत भाजपाला सळो की पळो करून सोडले आहे. एकेक प्रश्न मांडत भाजपाला कोंडीत पकडण्याची सेनेची खेळीही यशस्वी झालेली आहे. मागील महासभेत शिवसेनेची पीठासनावरील राजदंड पळवून नेण्यापर्यंत मजल गेली होती.भाजपाने वेगवेगळ्या माध्यमातून सेनेवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बुधवारी झालेल्या महासभेत शिवसेनेने साथरोगप्रश्नी लक्षवेधी मांडली असताना भाजपानेही लगोलग त्याच विषयावर लक्षवेध देत सेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. लक्षवेधीवर चर्चा करण्याची संधी अगोदर भाजपा गटनेत्याला देऊन सेनेला खिजवण्यात आले. तसेच, शिवसेनाप्रणित कामगार सेनेकडून मनपा कर्मचाºयांना दिवाळीनिमित्त २० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव (ठराव क्रमांक ३८८) दि. १९ आॅगस्टला झालेल्या महासभेत दिला होता. मात्र, भाजपा गटनेत्याने सेनेला श्रेय जाऊ नये याकरिता बुधवारी झालेल्या महासभेत २० हजारांचीच मागणी करणारा प्रस्ताव (ठराव क्रमांक ५९२) दिल्याने श्रेयाचीच ही लढाई सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.