चांदवड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी चांदवड पोलिसांनी शहरातून सशस्र संचलन केले.पोलीस स्थानकापासून सुरू झालेले संचलन आठवडे बाजारतळ, तांबट मज्जिद, गाडगेबाबा चौक, लेंडी हट्टी, उर्दू शाळा, नगर परिषद, श्रीराम रोड शिवाजी चौक, सोमवार पेठ, मार्केट कमिटी या मार्गे काढण्यात आले. मनमाडचे उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, गणेश गुरव, चांदवडचे पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड व विशाल सणस तसेच मनमाड येथील दंगा नियंत्रण पथक व पोलीस कर्मचारी, होमगार्ड सहभागी झाले होते.
पोलीस दलातर्फे सशस्र संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:17 IST