शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खडकी परिसरात मका पिकाचे लागवड क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:10 IST

खडकी : माळमाथ्यावर गेल्या २० दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. मात्र काल सोमवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित ...

खडकी : माळमाथ्यावर गेल्या २० दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. मात्र काल सोमवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी पेरण्या उशिराने सुरू होत आहेत. मागील वर्षी मृग नक्षत्रात पिकाची पेरणी झाली होती. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने पिकांची पेरणी उशिराने सुरू झाली आहे. शेतकरी आपल्या शेताची मळणीची कामे आटोपून पावसाची वाट बघत होते. मृग नक्षत्रातील पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हतबल झाला होता. आर्द्रा नक्षत्रातील पावसाचा हजेरीने शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होणार आहेत. माथ्यावरील कापूस उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण कापसाची पेरणी मृग नक्षत्रात केली तरच पुढील काळात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळते; मात्र कोरड कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे. त्या बदल्यात शेतकरी आता मक्‍याची पेरणी करणार असल्याने मक्याच्या उत्पादनात वाढ होणार आहे. बाजरी, कडधान्य, कांद्याची रोपे आदी कामांना शेतकऱ्याचा सुरुवात केलेली आहे. पाऊस हा पेरणीपुरता झाला असल्याने सध्या तरी विहिरींना पाणी अजूनही आलेले नाही. यामुळे बागायती शेतीलाही अजून घरघरच आहे. पावसाने उशीर केल्याने शेतकऱ्यांनी आपली पीक पेरणीचा खर्च कर्ज काढून बियाणे खरेदी आणि व खरेदी खते केली होती. त्याचप्रमाणे आपली आर्थिक अडचणी भागवून शेतीतील पिकांच्या लागवडीसाठी आपली पुंजी भांडवल शेती उत्पादनात लावून दिलेली आहे.

-----------------------

आर्थिक भांडवलासाठी शेतकऱ्यांची कसरत

सद्यस्थितीत या वर्षी कांद्याच्या उत्पादनाला बरा भाव असल्याने शेतकऱ्यांकडे स्वत:चे भांडवल उपलब्धता असल्याने शेतकरी आर्थिक भांडवलासाठी स्वतःच उभारत आहे. शेतकऱ्यांनी तूर्तास घेणे थांबवले आहे. शेतीचा मळणीच्या कामांसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर यंत्राचा वापर करून आपले व शेती तयार केलेली आहेत. त्याचप्रमाणे बैलजोडीने वखरणी किंवा बेले फाळणी करीत आहेत. एकंदरीतच शेतकरी आता आपल्या कामांमध्ये गुंतल्याचे चित्र दिसत आहे.