शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

कॅशलेस व्यवस्थेमुळे वनविभाग अडचणीत

By admin | Updated: January 16, 2017 01:29 IST

वनअधिकाऱ्यांपुढे पेच : पारंपरिक व्यवहारातील ‘अ‍ॅडव्हान्स’ पद्धत बंद पडणार

 नाशिक : वृक्षसंवर्धन आणि वनरक्षण करण्यासाठी वनविभाग ज्या मजुरांच्या भरवशावर निवांत आहे, त्या मजुरांना मोदी सरकारच्या कॅशलेस व्यवस्थेचा फटका बसल्याने शासनाचाच वनविभाग अडचणीत आला आहे. केवळ विश्वासाच्या भरवशावर उभा राहिलेला वनअधिकारी आणि वनमजूर यांच्यातील ‘अ‍ॅडव्हान्स’चा आर्थिक व्यवहार करणे आता अधिकाऱ्यांना धोक्याचा वाटू लागला आहे. त्यामुळे त्यांनी मजुरांना खिशातून अ‍ॅडव्हान्स देणे बंद केल्याने मजुरांकडूनही कामाला नकार मिळू लागला आहे. सामाजिक वनीकरण आणि वनविभागात वृक्षसंवर्धन आणि वृक्षलागवड ही महत्त्वाची कामे आहेत. वनरक्षणाचे काम वर्षभरासाठीचे असते तर वृक्षलागवडीसाठी जुलैपासून पुढे कामकाज केले जाते. याबरोबरच पाणी अडवा, पाणी जिरवा, वनतळे यांची देखरेख याबाबतची कामे वनमजुरांमार्फत केली जातात. स्थानिक मजूर असल्याने वनसंपत्ती जतन करण्यासाठी या मजुरांची मदत घेतली जाते. परंतु आता या वनमजुरांना काम देणे शासनाच्याच कॅशलेस भूमिकेमुळे अवघड होऊन बसले आहे. मजुरांना तत्काळ पैसे मिळणे अपेक्षित असते. परंतु शासनाकडून कामांना मंजुरी, मजुरीचे दर तसेच प्रत्यक्ष पैसे मिळेपर्यंत बराच वेळ लागतो. अशावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वत:च्या खिशातून मजुरांना अ‍ॅडव्हान्स देतात.