शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नियतीचे कालचक्र फिरल्याने कुंभार कारागिर गपगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 13:02 IST

येवला : कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योग व्यवस्थाच कोलमडली. गाव खेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले. परंपरागत व्यवसाय असणारा कुंभार कारागिर ...

येवला : कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योग व्यवस्थाच कोलमडली. गाव खेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले. परंपरागत व्यवसाय असणारा कुंभार कारागिर वर्षभर मेहनत करून उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी माठ  बनवतो, कोरोनाच्या संकटाने मात्र बनवलेले माठ घरातच पडून राहिल्याने कुंभार कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चक्र फिरवत नवनिर्मिती करणाऱ्या या कारागिरांना नियतीचे कालचक्र फिरल्याने ऐन हंगामात घरात गपगार बसण्याची वेळ आली आहे.उन्हाची तीव्रता वाढू लागताच मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये माठ, रांजण गरिबांचे फ्रिज म्हणून बाजारात विक्रीसाठी येत असतात. परंतु  कोरोनाच्या पाश्र्­वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने  गावोगावचे बाजार बंद झाले आहेत. बाजार नाहीत, परिणामी विक्री नाही यामुळे कुंभार कारांगिरापुढे पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्­न निर्माण झाला आहे. मार्च, एप्रिल, मे या कालावधीत मातीच्या माठ, रांजण यांना मोठी मागणी असते. या दरम्यान जमा झालेल्या पुंजीवर संपूर्ण वर्षाचे गणित कुंभार कारागीर जमवतात. कोरोना आपत्तीने या व्यवसायावर मोठे संकट ओढवले असून कुठपर्यंत हे लॉकडाऊन चालेल व कधी बाजारपेठ खुली होईल याबाबत साशंकता असल्याने कुंभार कारागिर आर्थिक संकटात सापडला आहे. परंपरागत कला जपत माठ बनवणे व्यतिरिक्त पोट भरण्याचे दुसरे साधन नसर्णा­या कुंभार कारागिरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्­न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे माठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य माती, उसाचा भुकठा, भाजण्यासाठी लागणारे इंधन यांचा खर्चही अंगावर पडला आहे.  शासनाने कुंभार कारागिरांना उदरनिर्वाहासाठी मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. --------कोट...आमचा पिढीजात व्यवसाय आहे. या व्यवसायांत आमची हयात घालवत आहे. आवा मध्ये जसा माठ भाजावा तसे आमचे हृदय माठ तयार करून हि विक्री होत नसल्याने भाजत आहेत.- रंगनाथ जाधव, कारागिर, कुसूर

टॅग्स :Nashikनाशिक