शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्य निवड; भाजपाकडून दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:34 IST

महापालिकेत स्वीकृत सदस्यांची निवडप्रक्रिया केवळ भाजपामुळे रखडली असून, सदर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी येत्या सोमवारी (दि.२५) शिवसेना-भाजपाच्या गटनेत्यांची बैठक सकाळी ११ वाजता बोलाविली आहे.

नाशिक : महापालिकेत स्वीकृत सदस्यांची निवडप्रक्रिया केवळ भाजपामुळे रखडली असून, सदर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी येत्या सोमवारी (दि.२५) शिवसेना-भाजपाच्या गटनेत्यांची बैठक सकाळी ११ वाजता बोलाविली आहे. महापालिकेत तौलनिक संख्याबळानुसार भाजपाचे तीन तर शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. सदर स्वीकृत सदस्यांची निवड महापालिका निवडणुकीनंतर महिनाभराच्या आत करणे क्रमप्राप्त होते. परंतु, या निवड प्रक्रियेला विलंब लागत गेला. त्यामुळे आयुक्तांनी स्वीकृतच्या सदस्यत्वासाठी उमेदवारांचे अर्ज देण्यासाठी सेना-भाजपाला २१ आॅगस्टची मुदत दिली होती. त्यावेळी भाजपाने एक महिन्याची मुदत वाढवून मागितल्याने आयुक्तांनी दि. १५ सप्टेंबरची तारीख जाहीर केली होती. परंतु, मुदतीत एकही अर्ज सादर न करता, भाजपाने पुन्हा एकदा महिनाभराची मुदत मागितली आहे. दरम्यान, शिवसेनेने मात्र आपल्या कोट्यातील दोन सदस्यांऐवजी चार नावांची घोषणा केली आहे. त्यात शिवसेना कार्यालयीन कर्मचारी सुनील गोडसे, राजेंद्र वाकसरे, ज्येष्ठ कार्यकर्त्या अलका गायकवाड व महिला आघाडीच्या अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांचा समावेश आहे. या चार नावांमधून दोघांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शिवसेनेची यादी तयार असतानाही केवळ भाजपाच्या आग्रहास्तव ती आयुक्तांकडे सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाचही सदस्यांची निवडप्रक्रिया रखडली आहे. भाजपाच्या गोटात मात्र स्वीकृत सदस्यत्वासाठी कमालीची चुरस निर्माण झालेली आहे.  स्थानिक आमदारांमध्येही या निवडीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे एकमत होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भाजपामुळे निवडप्रक्रियेला दिरंगाई होत असल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी येत्या सोमवारी (दि.२५) शिवसेना गटनेता विलास शिंदे आणि भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांची बैठक बोलाविली असून, त्यावेळी निवडप्रक्रियेविषयी अंतिम तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.