शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत’ची हंडी फुटली! नऊ महिन्यांनंतर मुहूर्त : भाजपाचे तीन, सेनेचे दोन सदस्य नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:11 IST

नाशिक : गेल्या नऊ महिन्यांपासून महापालिकेत नियुक्त करावयाच्या स्वीकृत सदस्यत्वाची हंडी अखेर सोमवारी (दि. २०) फुटली. महापौर रंजना भानसी यांनी महासभेत भाजपाचे तीन, तर शिवसेनेच्या दोन सदस्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषणा केली. शिवसेनेने दीड महिन्यांपूर्वीच आपल्या सदस्यांची नावे नगरसचिव विभागाकडे दिलेली होती, तर भाजपात मात्र सदस्यांच्या नावावर एकमत होत नव्हते. त्यामुळे नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. अखेर नऊ महिन्यांनंतर स्वीकृतच्या नियुक्तीला मुहूर्त लागला.

ठळक मुद्देनऊ महिन्यांनंतर मुहूर्त : भाजपाचे तीन, सेनेचे दोन सदस्य नियुक्तनऊ महिन्यांपासून महापालिकेत नियुक्त करावयाच्या स्वीकृत सदस्यत्वाची हंडी अखेर सोमवारी

नाशिक : गेल्या नऊ महिन्यांपासून महापालिकेत नियुक्त करावयाच्या स्वीकृत सदस्यत्वाची हंडी अखेर सोमवारी (दि. २०) फुटली. महापौर रंजना भानसी यांनी महासभेत भाजपाचे तीन, तर शिवसेनेच्या दोन सदस्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषणा केली. शिवसेनेने दीड महिन्यांपूर्वीच आपल्या सदस्यांची नावे नगरसचिव विभागाकडे दिलेली होती, तर भाजपात मात्र सदस्यांच्या नावावर एकमत होत नव्हते. त्यामुळे नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. अखेर नऊ महिन्यांनंतर स्वीकृतच्या नियुक्तीला मुहूर्त लागला.महासभेत महापौर रंजना भानसी यांनी भाजपाचे शहर सरचिटणीस प्रशांत गोरख जाधव, भाजयुमोचे शहराध्यक्ष अजिंक्य विजय साने आणि नाशिकरोड भाजपा मंडलाचे अध्यक्ष बाजीराव लहानू भागवत, तर शिवसेनेचे कार्यालयीन कर्मचारी सुनील गोडसे आणि महिला भाजपाच्या इच्छुक असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुजाता करजगीकर यांनी घराणेशाहीचा आरोप करत शहराध्यक्षांवरही टीकास्त्र सोडले. गेल्या ३० वर्षांपासून आपण निष्ठेने पक्षाचे काम करत आलो आहे; परंतु घराणेशाहीच चालणार असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी हमाल्याच करायच्या का? शहराध्यक्षांनी आपला मतदारसंघ टिकवण्यासाठी जवळच्या लोकांना सोयीची पदे दिली. आता शिक्षण मंडळाचे गाजर दाखविले जात आहे. महिला कार्यकर्त्यांत नाराजी स्वीकृत सदस्यत्वासाठी शिवसेनेने महिला कार्यकर्त्याला संधी दिली असताना भाजपातही एका महिलेला प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यामुळे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आणि पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय असणाºया सुजाता करजगीकर व भारती बागुल यांच्या नावांची चर्चा होत होती. परंतु, भाजपाने महिलांना संधी न दिल्याने इच्छुक महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. दीर्घकाळ पक्षात राहूनही न्याय न मिळाल्याने नाराजीची भावना इच्छुक महिलांनी बोलून दाखवली, तर काही इच्छुकांनी अजूनही आपल्याला पक्षाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे सांगितले.