शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

आरोग्याच्या ‘त्या’ कामांची थांबविली मंजुरी

By admin | Updated: August 8, 2014 00:57 IST

आरोग्याच्या ‘त्या’ कामांची थांबविली मंजुरी

 

नाशिक : आरोग्य समिती आणि सभापती यांना अंधारात ठेवून मंजूर केलेल्या पावणेदोन कोटी रुपयांच्या कामाची प्रशासकीय मंजुरी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी थांबविली असून, आरोग्य समितीत चर्चा होऊन नंतरच त्या मंजूर कराव्यात, असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.दरम्यान, परस्पर कामे मंजूर करून सभापती व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबाबत बोलणाऱ्या संबंधित आरोग्य विभागातील लिपिक चंद्रकांत वैष्णव याला निलंबित करण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाने सुरू केल्याचे कळते. तसेच याच प्रकरणी शिक्षण सभापतींवर या लिपिकाने टक्केवारीचे आरोप केल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात असून, सभापती ज्योती माळी यांनी त्याचा इन्कार केला आहे. गुपचूप मंजुरी देण्याचे कारणच संबंधित लिपिकाने ठेकेदारांकडून टक्केवारी खाल्ल्याचे उघड होते, असा टोला लगावला आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची दुरुस्ती तसेच आरोग्य केंद्रांभोवती संरक्षक भिंत बांधण्याच्या सुमारे पावणेदोेन कोटी रुपयांच्या २४ कामांना परस्पर मंजुरी देऊन सभापतींना व आरोग्य समितीला अंधारात ठेवल्याचा आरोप सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांनी केला होता. तसेच आरोग्य विभागातील संबंधित लिपिकावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. याच मागणीसाठी ज्योती माळी व बाळासाहेब माळी हे सुखदेव बनकर यांना मंगळवारी दुपारी भेटले. त्यावेळी बनकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, लिपिक चंद्रकांत वैष्णव, सभापतींचे स्वीय सहायक रवींद्र थेटे यांना बोलावून घेत प्रकरणाची माहिती घेतली. तसेच ही कामे समितीला व सभापतींना विश्वासात न घेताच मंजूर का केली, याचा जाब वैष्णव व डॉ. वाकचौरे यांना विचारला. तसेच प्रशासनाला वैष्णव याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्याचे आदेश दिले. तसेच मंजूर केलेली कामे थांबवून ती आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा करूनच मंजूर अथवा नामंजूर करावी, असे सभापतींना सांगितले. (प्रतिनिधी)