शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

७३२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:57 IST

अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ७३२ कोटी ९० लाखांच्या जिल्ह्याच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सादर करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या नियोजनात ५८.३३ कोटींची घट झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देनियोजन समिती बैठक । गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५८.३३ कोटींची घट

नाशिक : अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ७३२ कोटी ९० लाखांच्या जिल्ह्याच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सादर करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या नियोजनात ५८.३३ कोटींची घट झाल्याचे दिसून आले.जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवनात शनिवारी (दि. १८) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कृषिमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, खासदार भारती पवार, हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.प्रारंभी जिल्हाधिकारी मांढरे यांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ७९१.२३ कोटी निधीपैकी ३५ टक्के निधी खर्च झाल्याची माहिती दिली. यावेळी सर्वसाधारण, आदिवासी आणि अनुसूचित जाती उपाययोजनांतर्गत झालेल्या खर्चाचा तपशील मांडला. खर्चाचे प्रमाण कमी दिसत असले तरी चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये साधारणपणे चार महिन्यांच्या कालावधीत आचारसंहिता असल्याने काही प्रमाणात कामे मागे पडली. मात्र कामे १०० टक्के पूर्ण होण्याच्यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी सन २०१९-२० आर्थिक वर्षासाठी ७३२.९० कोटींचा आराखडा सादर केला. त्यास सभागृहाने मंजुरी दिली. त्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३४८ कोटी ८६ लाख, आदिवासी उपाययोजनाअंतर्गत २८३.८५ कोटी व अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत १०० कोटी १९ लाख अशी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यात ग्रामीण क्षेत्रात दलितवस्ती सुधार योजनेसाठी ४५ कोटी, रस्ते विकास योजनेसाठी २९.११ कोटी, लघु पाटबंधारे योजनेसाठी २२.७५ कोटी तरतूद करण्यात आली आहे, तर आरोग्य विभागाकरिता २४.१८ कोटी, आश्रमशाळा व वसतिगृह दुरु स्तीसाठी १८.५० कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी