शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती

By admin | Updated: June 23, 2017 00:34 IST

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून के.पी.एम.जी. अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या संस्थेची नियुक्ती कार्पोरेशच्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत रेट्रोफिटिंग, ग्रीनफिल्ड आणि पॅनसिटी याबाबत विविध प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून के.पी.एम.जी. अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या संस्थेची नियुक्ती नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशच्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. त्यामुळे, आता मोठ्या प्रकल्पांचे सुकाणू सदर संस्थेच्या हाती जाणार आहेत. दरम्यान, बैठकीत कंपनी सचिवांसह तीन अधिकाऱ्यांच्याही निवडीस मान्यता देण्यात आली.स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची तिसरी बैठक कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात झाली. यावेळी, स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सल्लागार संस्थेसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात क्रिसील, टीसीएस, आयलो, के.पी.एम.जी. यांसह पाच कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तांत्रिक आणि आर्थिकदृष्टीने निकष पाहून संचालक मंडळाने अखेर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून के.पी.एम.जी. अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या मल्टिनॅशनल संस्थेच्या नियुक्तीवर मान्यतेची मोहोर उमटवली. याशिवाय, कंपनीसाठी आवश्यक असलेल्या पदांच्या निवडीलाही मान्यता देण्यात आली. त्यात, कंपनी सचिव म्हणून महेंद्र शिंदे, माहिती व तंत्रज्ञान प्रमुख म्हणून प्रमोद गुर्जर तर मुख्य लेखाधिकारी बाबुराव निर्मळ यांचा समावेश आहे. मुख्य अभियंता स्थापत्य आणि शहर रचनाकार या पदांसाठी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी बोलाविण्यासही संमती देण्यात आली. कंपनीसाठी आवश्यक पदनिर्मिती झाल्याने आता खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीच्या कामांना गती येणार असल्याचे सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले.