शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रांवर ८९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 19:26 IST

वैद्यकीय अधिका-यांच्या नियुक्त्यांमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त जागा पुर्ण भरल्या गेल्या असून, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देरिक्त जागा भरल्या : तात्काळ रूजू होण्याचे आदेश १०६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ८८हून अधिक वैद्यकीय अधिका-यांची पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे एमबीबीएस ऐवजी बीएएमएसमधून भरण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषदेने बीएएमएस उमेदवारांकडून मागविलेल्या अर्जानुसार गुणवत्तायादीतील ८९ वैद्यकीय अधिकाºयांना रिक्त असलेल्या जागांवर तात्काळ नियुक्ती दिली आहे. या अधिकाºयांना येत्या दोन दिवसात नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सुचना प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दिल्या.

वैद्यकीय अधिका-यांच्या नियुक्त्यांमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त जागा पुर्ण भरल्या गेल्या असून, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक करण्याची तरतूद असली तरी, एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांकडून ग्रामीण व अति दुर्गम भागात सेवा देण्यासाठी शासकीय नोकरी पत्करण्याऐवजी खासगी प्रॅक्टिसकडे अधिक कल असल्याने गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सेवेतून अनेकांनी फारकत घेतली. परिणामी जिल्ह्यातील १०६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ८८हून अधिक वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त झाली होती. जे काही वैद्यकीय अधिकारी शिल्लक राहिले त्यांच्यामार्फत अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावून घेण्यात येत होती. यासर्व बाबी शासनाला अवगत केल्यानंतर एमबीबीएस ऐवजी बीएएमएस उमेदवारांची नियुक्ती करण्यात शासनाने हिरवा कंदील दिला. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने रिक्त ८८ जागांसाठी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात वृत्तपत्रातून जाहिरात दिली असता, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ४८५ उमेदवारांनी त्यासाठी अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी केल्यानंतर गुणवत्तेनुसार ४४७ उमेदवारांची यादी नोटीस बोर्डावर लावण्यात आली. गुणवत्ता यादीवर सुमारे ४० हरकती घेण्यात आल्या होत्या. त्याची पुर्तता करून मंगळवारी त्यातील २०० उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात थेट मुलाखतींसाठी बोलविण्यात आले होते. त्यातील ८९ उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्त्या देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी पात्र ठरलेल्या उमेदवारांना जागेवरच नियुक्ती पत्र देवून परस्पर प्राथमिक आरोग्य केंद्रांवर हजर होण्याच्या सुचना दिल्यामुळे जिल्ह्यातील रिक्त जागा भरल्या गेल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद