शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

महापौर, उपमहापौरांसह अर्ज दाखलपंचवटी विभागात २४ जागांसाठी ३९२ अर्ज सादर

By admin | Updated: February 4, 2017 01:49 IST

महापौर, उपमहापौरांसह अर्ज दाखलपंचवटी विभागात २४ जागांसाठी ३९२ अर्ज सादर

पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पंचवटीतील सहा प्रभागातील २४ जागांसाठी एकूण ३९२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी पंचवटीत महापौर, उपमहापौर, प्रभाग सभापती व आजी-माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. प्रभाग क्रमांक १ मधील अ जागेसाठी १८, ब जागेसाठी ३, क जागेसाठी १८, ड जागेसाठी १८ असे ५७ अर्ज दाखल झाले. प्रभाग २ मधील अ जागेसाठी २२, ब जागेसाठी १६, क जागेसाठी ८, तर ड जागेसाठी १२ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. प्रभाग ३ मध्ये अ जागेसाठी १५, ब जागेसाठी २०, क जागेसाठी ११, तर ड जागेसाठी २४ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. यात प्रभाग सभापती रूचि कुंभारकर, नगरसेवक सुनीता निमसे, समाधान जाधव, ज्योती गांगुर्डे, उद्धव निमसे, सुरेश खेताडे यांचा समावेश आहे, तर प्रभाग ४ अनुसूचित जाती महिला जागेतून नगरसेवक कविता कर्डक, डॉ. विशाल घोलप यांच्या मातोश्री प्रतिभा घोलप यांच्यासह सात इच्छुकांनी अर्ज सादर केले. अनुसूचित जमाती महिला गटातून सात महिलांंनी अर्ज दाखल केले. क गटातून ४, तर ड गटातून १४ इच्छुकांनी अर्ज सादर केले यात नगरसेवक रूपाली गावंड, हेमंत शेट्टी, सतनाम राजपूत, चांगदेव गुंजाळ, बाळासाहेब कर्डक, सागर लामखेडे, मुकुंद गांगुर्डे यांचा समावेश आहे. (वार्ताहर)