शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
4
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
5
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
6
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
7
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
8
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
9
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
10
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
11
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
12
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
13
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
15
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
16
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
17
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
18
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
19
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

चारही उमेदवारांचे अर्ज अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:31 IST

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लवादाकडे प्राप्त चार तक्रारींवर सोमवारी (दि.३१) लवादाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल देत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांच्यासह सेवक संचालक पदासाठी आलेले अर्ज नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, नंदा सोनवणे यांचे अर्ज अपात्र ठरविले.शनिवारी (दि.२९) मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक श्रीराम शेटे ...

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लवादाकडे प्राप्त चार तक्रारींवर सोमवारी (दि.३१) लवादाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल देत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांच्यासह सेवक संचालक पदासाठी आलेले अर्ज नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, नंदा सोनवणे यांचे अर्ज अपात्र ठरविले.शनिवारी (दि.२९) मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांच्या अर्जावर सुरेश डोखळे यांनी लवादाकडे हरकत नोंदविली होती. उमेदवारी अर्जासोबत आपण कुठल्याही अन्य शिक्षण संस्थेचे सभासद नसल्याचे प्रतिज्ञापत्रावर दिलेले असताना ते कादवा साखर कारखान्याच्या रा. स. वाघ शिक्षण संस्थेचे पदसिद्ध संचालक असल्याची हरकत सुरेश डोखळे यांनी घेतली होती. अन्य दोन हरकतींमध्ये अशोक पिंगळे यांनी सेवक संचालक पदासाठी अर्ज केलेल्या नानासाहेब दाते यांच्या विरोधात सेवा कार्यकाळ अवघा ४३ दिवसांचा शिल्लक असल्याने ते निवडणुक नियमावलीनुसार उमेदवारीसाठी अपात्र ठरत असल्याची हरकत घेतली. अशीच हरकत नंदा अशोक सोनवणे व गुलाबराव भामरे यांच्या विरोधात सयाजी पाटील व केशव शिरसाट यांनी नोेंदविली. हा सेवा कार्यकाळ पाच वर्षांपेक्षा कमी राहिल्याने त्यांना अपात्र ठरविण्याबाबत ही हरकत होती. या दोन्ही हरकती निवडणूक निर्णय मंडळाने घटनेचा आधार घेत फेटाळल्या होत्या. त्यामुळे संबंधित तक्रारदारांनी याबाबत लवादाकडे हरकती नोंदविल्या होत्या. त्यावर रविवारी (दि.३०) सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यावार सोमवारी लवादाकडून निर्णय देण्यात येऊन सुरेश डोखळे, अशोक पिंगळे, नंंदा सोनवणे व गुलाबराव भामरे यांचे अपील लवादाने मान्य करीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे तसेच नानासाहेब दाते, नंदा अशोक सोनवणे व गुलाबराव भामरे यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले.आपण गेल्या दोन महिन्यांपासून कादवा संचलित रा. स. वाघ शिक्षण संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असून, बैठकीला जात नाही. तसेच कोणत्याही इतिवृत्तावर स्वाक्षरी केलेली नाही. मात्र आता लवादाने निर्णय दिला असल्याने तो मान्य आहे. या विरोधात न्यायालयात जाणार नाही.- श्रीराम शेटे, संचालक तथा माजी जिल्हाध्यक्ष राष्टÑवादी कॉँग्रेस