शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांचे आधी केडर नंतर अर्ज

By admin | Updated: January 31, 2017 00:49 IST

पुरोगामी आघाडी : २ तारखेला सर्व उमेदवार भरणार अर्ज

नाशिक : बड्या राजकीय पक्षांमध्ये अद्यापही उमेदवारीची स्पष्टता नसल्याने पक्षनेत्यांची कसोटी लागली आहे. सर्वच ठिकाणी प्रबळ दावेदारी करण्यात आल्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. असे चित्र एकीकडे असताना दहा पक्षांच्या पुरोगामी लोकशाही आघाडीने केडरबेस तयारी चालविली आहे. इच्छुक उमेदवारांची १ फेब्रुवारीला कार्यशाळा घेण्यात येणार असून, २ तारखेला २१ प्रभागांमध्ये उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.  सेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस या पाच प्रमुख पक्षांच्या विरोधात पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन करण्यात झाली आहे. एआयएमआयएम, बीआरएसपी, रिपाइं सेक्युलर, संभाजी ब्रिगेड, आवामी विकास पार्टी, एपीआय, बीएमपी, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, बहुजन भीमसेना या पक्षांची आघाडी निवडणुकीची तयारी करीत आहे. उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, एक तारखेला उमेवारांच्या नावांची घोषणा होणार आहे. ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक आहेत त्या ठिकाणी समन्वयाने तोडगा काढण्यात येऊन नंतर नावे जाहीर केली जाणार आहेत. या सर्व उमेदवारांना अगोदर प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती पुरोगामी आघाडीचे समन्वयक डॉ. संजय अपरांती यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)कार्यशाळा घेतली जाणारउमेदवारी अर्ज कसा भरावा, मतदारांपुढे जाताना प्रचाराचे कोणते मुद्दे असले पाहिजे. नाशिक शहराची सध्याची परिस्थिती आणि होऊ शकणारी कामे आदि अनेक बाबींवर उमेदवारांची संपूर्ण दिवस कार्यशाळा घेतली जाणार आहे. आघाडीचे उमेदवार आपापल्या पक्ष निशाणीवर निवडणूक लढविणार असले तरी आघाडीचा स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यावरच निवडणूक लढविली जाणार आहे. याचे संपूर्ण प्रशिक्षण उमेदवारांना देण्यात येणार आहे. २ फेब्रुवारीला सर्व उमेदवार आपापल्या विभागीय कार्यालयांमध्ये अर्ज दाखल करणार आहेत.