शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरोधात कायद्याचा आधार घेण्याचे आवाहन

By admin | Updated: March 10, 2017 01:03 IST

त्र्यंबकेश्वर : सायबर गुन्हेगारी हल्ली बोकाळली असून संरक्षणार्थ असलेल्या कायद्याच्या आधारे महिलांनी संरक्षण करावे असे प्रतिपादन अ‍ॅड. मीलन खोहर यांनी केले.

 त्र्यंबकेश्वर : महिलांना सायबर क्राइमद्वारे त्रास देण्याचे प्रकार हल्ली घडतात. महिलांनी याबाबत माहिती घेतली पाहिजे. सायबर गुन्हेगारी हल्ली बोकाळली असून महिला संरक्षणार्थ असलेल्या कायद्याच्या आधारे महिलांनी आपले संरक्षण करावे असे प्रतिपादन अ‍ॅड. मीलन खोहर यांनी केले. त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीतर्फे आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजया लढ्ढा होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. निशिगंधा मोगल, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे-मानुरे यांसह जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत गायधनी शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र, सुचिता शिखरे, मेघा दीक्षित, अश्विनी अडसरे, सुयोग वाडेकर आदि उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. खोहर यांनी सायबर गुन्ह्यांची रंजक पण सखोल माहिती दिली. निशिगंधा मोगल यांनी आपल्या मनोगतात भारतीय इतिहासातील कर्तबगार महिलांच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यांच्याबद्दल बोलताना जिजाऊ माँसाहेबांसारखे संस्कारक्षम मातृत्व लाभले पाहिजे. आपल्या मुलांवर असे संस्कार महत्त्वाकांक्षा केल्या तरच आपली मुले-मुली कर्तबगार होतील. अहल्याबाई होळकरांबाबत त्या म्हणाल्या, अहल्याबाई होळकरांनी कुशल प्रशासन देऊन राज्य कारभार केला. आपल्या व्यक्तिगत खर्चासाठी त्यांनी कधी सरकारी खजिन्यातील पैसा वापरला नाही. जनतेच्या पैशातून केलेल्या सुविधा आजही विहिरी, बारवा, धर्मशाळा अवशेषांच्या स्वरूपात पाहावयास मिळतात. अशा महिलांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करून त्यांचा आदर्श आपण व विशेष करून अधिकारी महिलांनी घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. डॉ. माधवी लोंढे यांनी मनोगतात महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे, असे मत मांडले. नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्र माच्या प्रारंभी चिमुरड्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष माधुरी वैभव जोशी, सुनीता सारडा, ऋत्विजा फडके, अनुराधा पाटील, प्रणिता पाटणकर, स्नेहल भालेराव, पूनम पाटील, वंदना गंगापुत्र, पल्लवी शिंगणे, सुवर्णा वाडेकर, रेखा भुतडा, मंजूषा चांदवडकर, मनीषा बदादे आदि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होत्या.