शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचे आवाहन

By admin | Updated: September 14, 2016 22:28 IST

नामपूर : मराठा क्र ांती मूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी बैठकीला प्रतिसाद

नामपूर : येत्या २४ सप्टेंबरचा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील सर्व शाळा -महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी तालुका दौऱ्यात केले आहे. बागलाण तालुक्यातील नामपूर गटाचा दौरा नुकताच संपन्न झाला असून, या दौऱ्यात ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, डॉ. भामरे, भाऊसाहेब अहिरे, अनिल पाटील, यतिन पगार, प्रशांत पाटील, सिंधूबाई सोनवणे, अरविंद सोनवणे, रमेश पवार, खेमराज कोर, विनोद पाटील, संभाजी सावंत, संजय भामरे, कृष्णा भामरे, काकाजी रौंदळ, पांडुरंग सोनवणे, दीपक पगार, बाजीराव सावंत हे गावागावात बैठका घेऊन २४ सप्टेंबरच्या क्रांती नियोजनबाबत जनजागृती करीत आहेत. यात आपल्या प्रमुख मनोगतातून जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात, हा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माविरोधात नाही. आजच्या घडीला मराठा समाजावर जो अन्याय होत आहे. त्याला वाचा फोडण्याकरिता हा मोर्चा असून, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, आरक्षण पद्धत रद्द करावी, समान नागरी कायदा लागू करावा, कोपर्डी घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा जाहीर करावी, सैराटसारखे चित्रपट बंद करावेत यासारख्या अन्य बाबी शैलेश सूर्यवंशी यांनी मांडल्या. या प्रत्येक गावनिहाय बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या नावाचे स्मरण मनोगतातून व्यक्त होत होते. इतर समाजातील नेतेसुध्दा यात सहभागी झाले होते.यात ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील यांनी कोपर्डी घटनेतील बालिकेला श्रद्धांजली वाहन्याकरिता २४ तारखेला तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवून शालेय मुलांनी काळा शर्ट, काळी पॅन्ट व कपाळावर काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. नामपूर गटात या गांव बैठकाना मोठा प्रतिसाद लाभत आहे. (वार्ताहर)