शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

अंत्योदय लाभार्थ्यांच्या यादीसाठी हरकतींचे आवाहन

By admin | Updated: November 18, 2016 23:47 IST

प्रारूप यादी : रविवारपर्यंत मुदत

नाशिकरोड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय योजनेसाठी वाढीव इष्टांक प्राप्त झाले असून, यापूर्वी या योजनेतील बीपीएल लाभार्थ्यांमधून वाढीव अंत्योदय लाभार्थ्यांची प्रारूप निवड यादी प्रसिद्ध केली आहे. या प्रारूप यादीबाबतच्या हरकती येत्या रविवारपर्यंत लेखी स्वरूपात धान्य वितरण अधिकारी नाशिकरोड यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन तहसीलदार शर्मिला भोसले यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी नुकतेच वाढीव इष्टांक प्राप्त झाले आहे. त्यानुसार आता १२ हजार २० या अंत्योदय योजनेच्या लाभार्थी शिधापत्रिकांच्या संख्येत २०७९ इतकी वाढ होणार आहे. चार लाख ९१ हजार ७४८ इतक्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या असून, त्यामध्ये एक लाख २१ हजार ५५६ इतकी वाढ होणार आहे. त्यासाठी अंत्योदय योजनेत समाविष्ट असलेले बीपीएल लाभार्थी यांच्यामधून वाढीव अंत्योदय लाभार्थींची निवड केली जाणार आहे. सध्याच्या ५५ हजार बीपीएल शिधापत्रिका धारकांतूनच ही निवड केली जाणार आहे, तर यापूर्वी प्राधान्य योजनेत समाविष्ट नसलेले अप्राधान्य केशरी शिधापत्रकाधारकांतून वाढीव प्राधान्य कुटुंब लाभार्थींची निवड केली जाणार आहे. तसेच आधार क्रमांक, बॅँक खाते व उत्पन्नाचा दाखला असणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)