लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : नैसर्गिक संकटात पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षक पीक विमा म्हणून सर्वत्र प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू असून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकºयांनी पीक विमा काढण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वत्र शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज भरण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव असताना दुसरीकडे सोयाबीनच्या बियाणशंमध्ये दोष आढळल्याने दुबार पेरणी करूनही अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही तर काही ठिकाणी तुरळक बियाणे उगवलेले आहे. त्यामुळे पेरणीसाठी झालेला खर्च वाया जाऊ नये यासाठी शेतकºयांनी तात्काळ प्रधानमंत्री पीक विम्याचा अर्ज सीएससी सेंटरवर भरून घेण्याचे आवाहन कृषी सहायक रमेश वाडेकर यांनी केले आहे.
पिक विमा भरण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:29 IST
मानोरी : नैसर्गिक संकटात पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षक पीक विमा म्हणून सर्वत्र प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू असून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकºयांनी पीक विमा काढण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पिक विमा भरण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
ठळक मुद्देपेरणीसाठी झालेला खर्च वाया जाऊ नये यासाठी