शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण संख्या वाढू लागल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:34 IST

अभोणा : शहरात सक्रिय कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य खात्याने कंबर कसली आहे.

ठळक मुद्देअभोणा : निर्जंतुकीकरण,अँटिजेन तपासणी मोहिमेस वेग

अभोणा : शहरात सक्रिय कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य खात्याने कंबर कसली आहे.शासन निर्देशानुसार कोरोना बाबत जनजागृती करणे, प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करणे, विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, प्रतिबंधित क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करणे, विवाह व धार्मिक कार्यक्रम नियंत्रित करणे. यासाठी कळवण पंचायत समितीमार्फत विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.अभोण्यासाठी ग्रामविकास अधिकारी जिभाऊ जाधव, सोनाली कोल्हे, सुरेश येवला, ज्योती जाधव, चंद्रकला चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभोणा शहरातील राम गल्ली व भवानी पेठेत कोरोना संसर्गित दहा रुग्ण आढळल्याने संबंधित क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे.दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात दवाखाने, मेडिकल, जीवनावश्यक वस्तू या अत्यावश्यक सेवा वगळून शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन सरपंच सुनीता पवार, उपसरपंच भाग्यश्री बिरारी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. शहराच्या मुख्य बाजार पेठेसह इतर सर्व भागात शुकशुकाट दिसला.

अत्यल्प प्रतिसाद ;वाढत्या कोरोना संसर्गास पायबंद घालण्यासाठी आरोग्य खात्याने अभोणा ग्रामीण रुग्णालयातील कोरोना डेडिकेटेड हेल्थ सेंटर मध्ये व्यावसायिकांनी आपली कोरोना (अँटिजेन) तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले होते. त्यासाठी ३०० लोकांच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अवघ्या ४६ लोकांनी कोरोना (अँटिजेन) तपासणी करुन घेतली. त्यात ११ कोरोना संसर्गित सापडले असून यातील काही रूग्णांना येथील कोरोना सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे, तर काही नाशिकला जाऊन उपचार घेणार असल्याचे समजते. दरम्यान, ही तपासणी मोहीम सोमवारपासून जोमाने सुरू करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक बहिरम, डॉ. पुरुषोत्तम खंबाईत यांनी सांगितले. अँटिजेन तपासणी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रकाश आहेर. सहायक राकेश भामरे, कोविड टेक्निशियन मयूर पवार, आनंद जाधव, तुकाराम बागुल आदी करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल