शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

By admin | Updated: June 2, 2017 01:59 IST

नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लूने अजूनही पाठ सोडलेली नसून, बुधवारी (दि. ३१) देशवंडी, ता. सिन्नर येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लूने अजूनही पाठ सोडलेली नसून, बुधवारी (दि. ३१) देशवंडी, ता. सिन्नर येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. त्यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या २६ झाली असून, त्यात शहरातील ९ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लूच्या कक्षात विशेष दक्षता घेतली जात असून, संशयितांचे स्क्रिनिंग केले जात असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. शहरात मार्च महिन्यापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत भर पडताना दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात १, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये ५४, एप्रिलमध्ये ६६ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. मे महिन्यात उपचारासाठी दाखल ३८ संशयितांपैकी २३ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यात बुधवारी शहरात खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या सीमा पुंडलिक बरके (वय ४२) या महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिला ही सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील आहे. मे महिन्यात स्वाइन फ्लूचा जोर काहीसा कमी झालेला असला तरी त्याने पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढल्या आहेत. रुग्णालयात संशयित रुग्णांचे स्क्रिनिंग केले जात आहे. आतापर्यंत २५०० हून रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. स्वाइन फ्लूच्या कक्षातही रुग्णांबाबत विशेष दक्षता घेतली जात असून, औषधांचा साठा पुरेसा असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. डेकाटे यांनी दिली.