शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचारी खुनातील दुसरा संशयित ताब्यात

By admin | Updated: June 4, 2017 02:56 IST

पंचवटी : मखमलाबाद नाक्यावर राहणारा मनपा सफाई कामगार अरुण अशोक बर्वे यांच्या खुनाचे गूढ उकलण्यास पंचवटी पोलिसांना यश आले

 लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : मखमलाबाद नाक्यावर राहणारा मनपा सफाई कामगार अरुण अशोक बर्वे यांच्या खुनाचे गूढ उकलण्यास पंचवटी पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी या खूनप्रकरणी रामवाडीतील फरार सराईत गुन्हेगार वैभव ऊर्फ विकी दत्तात्रय काळे या दुसऱ्या संशयितास ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मयत मनपा कामगार बर्वे याचा खून लुटमारीसाठीच केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे़ बुधवारी (दि. ३१) अज्ञात मारेकऱ्यांनी बर्वे याचा खून करून मृतदेह कोशिरे मळ्यासमोरील गोदावरी नदीपात्रात फेकून दिला होता. नदीपात्रात मृतदेह असल्याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मयताच्या पाठीवर, डोक्यावर काहीतरी शस्त्राने वार केल्याच्या जखमा दिसून आल्या होत्या, तर ज्या ठिकाणी मृतदेह मिळाला तेथून काही अंतरावर रक्ताचे डाग, अर्धवट जळालेला चष्मा मिळाला होता. बुधवारी (दि़३१) पहाटेच्या सुमाराला मयत बर्वे रामवाडीतील पुलावरून आपल्या दुचाकीवरून जात असताना संशयित आरोपी कृष्णा चांदवडकर व सराईत गुन्हेगार वैभव काळे या दोघांनी बर्वे यांना शस्त्राचा धाक दाखवून अडविले.