शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

‘सामूहिक प्रयत्नांमुळेच दुसरी पर्वणी यशस्वी’

By admin | Updated: September 14, 2015 23:52 IST

‘सामूहिक प्रयत्नांमुळेच दुसरी पर्वणी यशस्वी’

नाशिक : पहिल्या पर्वणीतील टीकेनंतर माध्यमे, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांच्याशी चर्चा करून केलेले बंदोबस्ताचे फेरनियोजन, सर्व विभागांसह नाशिककरांचा सकारात्मक प्रतिसाद, सीसीटीव्हीची मोलाची मदत यामुळे दुसरी शाही पर्वणी सुलभपणे पार पडली़ त्यामुळे येत्या शुक्रवारी (दि़१८) होणाऱ्या तिसऱ्या पर्वणीलाही अशाच प्रकारचे नियोजन करण्यात येणार असून, शहरातील सीसीटीव्ही कायमस्वरूपी ठेवण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ जगन्नाथन म्हणाले की, पहिल्या पर्वणीनंतर नागरिकांच्या सूचनांचा आदर करून बंदोबस्ताचे फेरनियोजन करण्यात आले़ त्यामध्ये शासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी चांगले काम केले असून, पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावल्याने लाखो भाविकांचे सुयोग्य व सुरक्षित नियंत्रण आम्ही करू शकलो. सतरा हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, रवींद्र सिंघल, मकरंद रानडे, अशोक मोराळे यांच्या अनुभवाचाही फायदा झाला़ पर्वणीचे नियोजन पहिल्यासारखेच असले तरी अंमलबजावणी व नियंत्रण यातील बदलाचा चांगला परिणाम दिसून आला़पोलिसांना भाविकांसोबत सौजन्याने वागण्याच्या धड्यांचाही चांगला परिणाम झाला़ अपघातातील जखमींची मदत, हरवलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष कंट्रोल रूमपर्यंत नेऊन ध्वनिक्षेपकावरून त्यांच्या नातेवाइकांना माहिती देणे, पाण्यात बुडणाऱ्यांचा जीव वाचविणे असे कार्य पोलिसांनी केले़ वृद्ध व अपंग भाविकांसाठी सुरू केलेली बससेवा, रामकुंड परिसरातील भुरट्या चोरांवर नजर ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे ७० कर्मचारी साध्या वेषात कार्यरत होते़ त्यांनी १६ संशयितांना ताब्यात घेऊन पाच सोनसाखळ्याही हस्तगत केल्या़ अचानक भाविकांची गर्दी वाढल्यास त्यासाठी राखीव फौजफाटा ठेवण्यात आला होता़ दुसऱ्या पर्वणीला सुमारे ६० ते ६५ लाख भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज आहे़ तिसऱ्या पर्वणीसाठी भाविक कमी येतील असा अंदाज असला तरी भाविक कितीही संख्येने आले तरी आमची तयारी झाली आहे़ यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, पोलीस उपायुक्त मकरंद रानडे, अशोक मोराळे, एन. अंबिका, माधव तांबडे, संजय दराडे, अविनाश बारगळ, श्रीकांत धिवरे आदिंसह अधिकारी उपस्थित होते़