शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अन् दीड महिन्यानंतर घडले वीजेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:05 IST

परिसरातील बोरीचीवाडी येथील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होऊन नादुरु स्त झाला होता. लॉकडाऊनमध्ये काहीशा सुस्त झालेल्या विद्युत मंडळाच्या ढिसाळ कारभाराला नागरिक चांगलेच वैतागले होते. दीड महिन्यापासून देवगाव येथील बोरीचीवाडीत काळोख दाटल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जागे झालेल्या महावितरण विभागाने ट्रान्सफार्मर दुरुस्त केला आणि नागरिकांना वीजेचे दर्शन घडले.

ठळक मुद्देबोरीचीवाडी : विद्युत रोहित्र बसविल्याने नागरिकात समाधान

देवगाव : परिसरातील बोरीचीवाडी येथील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होऊन नादुरु स्त झाला होता. लॉकडाऊनमध्ये काहीशा सुस्त झालेल्या विद्युत मंडळाच्या ढिसाळ कारभाराला नागरिक चांगलेच वैतागले होते. दीड महिन्यापासून देवगाव येथील बोरीचीवाडीत काळोख दाटल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जागे झालेल्या महावितरण विभागाने ट्रान्सफार्मर दुरुस्त केला आणि नागरिकांना वीजेचे दर्शन घडले.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरीचीवाडी येथील नागरिकांना विजेच्या समस्येने ग्रासले होते. वारंवार तक्रार करूनही विद्युत मंडळानी दखल घेतली नाही. दोन आठवड्यांपूर्वी टाके हर्षे येथील निर्गुडपाड्याचा ट्रान्सफार्मर विजेच्या कमी जास्त दाबामूळे जळाल्याने विद्युत मंडळाने त्वरीत उपलब्ध करून दिला होता. परंतू, ट्रान्सफार्मर शिल्लक नसल्याचे कारण देऊन विद्युत मंडळ वेळ मारून नेत असल्याचा आरोप नागरिक करत होते. दीड महिन्यापासून खंडित असलेल्या वीजपुरवठ्यामूळे विजेवर चालणारी उपकरणे धूळ खात पडून असल्याने निकामी झाली आहेत.विजेअभावी पाणी पुरवठा होत नसल्यामुळे महिलावर्गांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. अखेर ‘लोकमत’ मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन दोनच दिवसांत ट्रान्सफार्मर बसविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण