शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

येवला महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:14 IST

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाइलचा बळी न होता साहित्याला आपला भाव विषय बनवून त्यातून जीवनमूल्य घ्यावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांनी केले.

येवला : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाइलचा बळी न होता साहित्याला आपला भाव विषय बनवून त्यातून जीवनमूल्य घ्यावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांनी केले.येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य प्रा. शिवाजी गायकवाड, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुशील गुजराथी, अ‍ॅड. माणिकराव शिंदे, सुरेश सानप व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी तुकाराम धांडे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत निसर्गाच्या कविता सादर केल्या. तसेच कवितेच्या निर्मितीसंदर्भात अनुभव कथन केले. प्रा. डॉ. जी.जे. भामरे व प्रा. डी.के. कन्नोर यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. के. के. बच्छाव यांनी करून दिला, तर डॉ. मनीषा गायकवाड यांनी आभार मानले. याप्रसंगी लेखापाल अजय सोमानी यांच्याकडून वाणिज्य शाखेतील वैष्णवी मारवाडी या प्रथम आलेल्या विद्यार्थिनीस रुपये एक हजार रोख व प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांचे वडील कै. विठ्ठलराव गमे यांच्या स्मरणार्थ कैलास गायकवाड यास मराठी विषयात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच क्रीडा विभागातील राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडू प्रतीक्षा बिल्लाडे, कांचन जोशी, यशवंती गुप्ता, पूजा काळे, रोहन लोणारी, रोहन परदेशी व दर्शन ताठे यांचाही गौरव करण्यात आला. प्रा. शारदा अहिरे, राजेंद्र सौंदाणे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक