शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बारागावपिंप्री महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:14 IST

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिकरोड संचलित बारागावपिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

बारागावपिंप्री महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गणपतराव मुठाळ, डॉ. एन. एस. उमराणी, डी. एल. फरताळे, प्रवीण जोशी, मिलिंद पांडे, मंगल सांगळे, सुजाता डावखर, मंजुश्री उगले, ललित गांगुर्डे, गोरक्षनाथ पगार आदी.सिन्नर : साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिकरोड संचलित बारागावपिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.संस्थेचे अध्यक्ष गणपतराव मुठाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी उपस्थित होते. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असल्यास विद्यार्थ्यांना चिकित्सक वृत्तीने विचार करण्याची क्षमता, नावीन्यपूर्ण विश्लेषण करण्याची क्षमता आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असणारी हातोटी ही क्षमता कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर धाडस, संयम, शहाणपण आणि न्यायबुद्धी हे गुण शिक्षणातून विकसित होणे महत्त्वाचे आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश मिळविणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले. अनेक दाखले देत त्यांनी आपले विचार मांडले. डी. एल. फरताळे यांनी डॉ. एन. एस. उमराणी यांचे स्वागत केले. खेड्याकडे चला हे आमच्या महाविद्यालयाचे मुख्य ध्येय असल्याचे फरताळे यांनी मनोगतातून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणगौरव व मंगल सांगळे यांनी केले. मंजुश्री उगले यांनी क्रीडा अहवालाचे, तर रेखा नन्नावरे यांनी सांस्कृतिक अहवालाचे वाचन केले. स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण जोशी, मिलिंद पांडे यांच्यासह मान्यवर तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुजाता डावखर, ललित गांगुर्डे यांनी केले. आभार गोरक्षनाथ पगार यांनी मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक