शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक स्नेहसंमेलन

By admin | Updated: March 7, 2017 00:24 IST

येवला : तालुक्यातील विखरणी येथील लक्ष्मी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

 येवला : तालुक्यातील विखरणी येथील लक्ष्मी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त आयोजित फेस्टिव्हलचे उद्घाटन तालुका पोलीस निरीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य अरुण थोरात होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य संजय बनकर उपस्थित होते. मान्यवराच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविणाऱ्या अश्विनी जालिंदर शेलार या विद्यार्थिनीचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना संजय बनकर म्हणाले की, आपल्या पाल्यावर कोणतेही संस्कार हे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वयात होत असतात. या वयात मनावर कोरलेले संस्कार आयुष्यभर तसेच राहतात. दिवस उजाडण्याचा नयनरम्य देखावा स्टेजवर साकारत लक्ष्मी इंग्लिश मीडियमच्या चिमुरड्यांनी कार्यक्र मास सुरु वात केली. शेतीवर आधारित गीते मुलांनी सादर केली. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा ‘अफजल खानाचा वध’ हा ऐतिहासिक पोवाडा सादर केला. ज्युनिअर केजीच्या चिमुकल्यांनी सादर केलेले ‘खंडेरायाच्या लग्नाला’ या गीतावरील नृत्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. बनकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक रुपचंद वाघमारे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील गायकवाड, संस्थापक अध्यक्ष मोहन शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र मास कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणपत कांदळकर, संचालक देवीदास शेळके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, संत मुरलीधर बाबा पतसंस्थेचे अध्यक्ष धोंडीराम कुऱ्हाडे, सुभाष गायकवाड यांच्यासह रवींद्र शेलार, भाऊसाहेब गायकवाड, श्रावण वाघमोडे, डी. एन. कदम आदिंसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक किरण ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा शेलार यांनी आभार मानले. मनीषा पाटील, वर्षा शेलार, तेजस्वी लासुरे, राणी कदम, कल्पना आव्हाड, ज्योती कदम, ज्योत्स्ना बत्तीसे उपस्थित होते. (वार्ताहर)