निफाड : निफाड नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांवरील मतदारांच्या हरकतींवर बुधवारी नगरपंचायतीचे प्रशासक तथा तहसीलदार डॉ. संदीप अहेर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर संध्याकाळी अंतिम यादी जाहीर करण्यात आली. १४ सप्टेंबरला प्रारूप यादी प्रसिद्ध करून १९ सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (दि. २३) प्रशासक डॉ. संदीप अहेर यांच्यासमोर हरकतींवर सुनावणी झाली. यावेळी दोन प्रभागांमध्ये पुनरावृत्ती झालेली नावे, मयत व्यक्तींची नावे रद्द करणे तसेच दुसऱ्या प्रभागात नावाची नोंद असल्याच्या सुमारे १०६ तक्रारींचा यात समावेश होता. या हरकतींसंदर्भात चौकशी व निर्णय घेण्यासंदर्भात कार्यवाही झाली. यावेळी बहुतांश हरकतींचे निराकरण करण्यात आले. त्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात आली.दरम्यान, प्रारूप यादीसंदर्भात हरकती नोंदविणारे अर्जदार व इच्छुक उमेदवारांसह विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी ११ वाजेपासूनच गर्दी केली होती. (वार्ताहर)
निफाड नगरपंचायतीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर
By admin | Updated: September 23, 2015 23:05 IST