शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:37 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, आवश्यक त्यावेळी अद्ययावत करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपरीक्षा : अंदाजित वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, आवश्यक त्यावेळी अद्ययावत करण्यात येणार आहे. अंदाजित वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता आहे. होणाºया बदलांची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे उपसचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे. उमेदवारांना आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे.सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा १ डिसेंबरला तर राज्य कर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मुख्य परीक्षा ८ डिसेंबर आणि शिक्षण सेवा गट- ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची मुख्य परीक्षा १५ डिसेंबर २०१९ होणार आहे.विविध विभागांच्या परीक्षांचे नियोजन४ सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा १९ जानेवारीला तर राज्य सेवा पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारीला होणार असून, मुख्य परीक्षा १३, १४ व १५ जुलैदरम्यान होणार आहे.४ महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २४ मार्चला, मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक २८ जुलै तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पेपर क्रमांक दोन ११ आॅगस्टला आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन २५ आॅगस्टला घेण्यात येणार आहे.४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा ३१ मार्चला तर मुख्य परीक्षा ७ जुलैला होणार असून, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा ७ एप्रिलला आणि मुख्य परीक्षा १८ आॅगस्टला होणार आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २८ एप्रिलला तर मुख्य परीक्षा १ सप्टेंबरला होणार आहे.४ महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा १९ मे तर मुख्य परीक्षा २९ सप्टेंबरला होणार असून, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा २६ मे रोजी तर मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १६ जून, महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक ६ आॅक्टोबरला, लिपिक टंकलेखक महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन १३ आॅक्टोबरला व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन २० आॅक्टोबर आणि कर सहायक महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन ३ नोव्हेंबरला होणार आहे.४ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २३ जूनला व मुख्य परीक्षा २ नोव्हेंबरला होणार असून, महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा ९ नोव्हेंबर, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबरला होणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMPSC examएमपीएससी परीक्षा