नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत पॅनल निर्मितीत सुरू असलेला उमेदवारांचा शोध अखेर संपला असून, शनिवारी दोन्ही पॅनलने अवघ्या अर्धा तासाच्या फरकाने पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा करतानाच पारदर्शी कारभाराची हमी दिली आहे. दोन्ही पॅनलने मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा दावा करून पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलची घोषणा झाल्यानंतर पॅनल निर्मितीला वेग आला. तत्पूर्वी हिरे व ढिकले यांचे एकत्रित पॅनल तयार होईल, अशी अटकळ बांधली जात होती; परंतु काही जागांवर व उमेदवारांबाबत एकमत होत नसल्याने हिरे यांनी त्यांच्या पॅनलच्या नावांची घोषणा केल्याने ढिकले यांचा पॅनल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. दोन दिवस यासंदर्भातील हालचाली गतिमान होऊन शनिवारी दुपारी तीन वाजता अॅड. सुनील ढिकले यांनी ‘सहकारमहर्षी स्व. उत्तमराव ढिकले पॅनल’ची घोेषणा केली. या पॅनलचे नेतृत्व स्वत: सुनील ढिकले व आमदार अनिल कदम करीत असून, त्यात अनुसूचित जाती-जमाती गटातून नाना सोनवणे, भटके विमुक्त गटातून कोंडाजीमामा आव्हाड, इतर मागास गटातून आमदार अनिल कदम, महिला गटातून लिना योगेश अहेर व पुष्पावती नानाजी दळवी यांचा समावेश आहे. बिगर शेतकरी ‘क’ गटातून सुनील ढिकले हे उमेदवारी करतील.
दोन्ही पॅनलच्या उमेदवारांची घोषणा
By admin | Updated: May 3, 2015 01:34 IST