शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील मराठा मोर्चाचा मार्ग जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:46 IST

राज्यातील सकल मराठा समाजातर्फे मुंबईत ९ आॅगस्ट क्रांतिदिनी काढण्यात येणाºया मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, मोर्चात सहभागी होण्याचा मार्ग व मोर्चेकºयांसाठी आचारसंहिता सोशल मीडियातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नकाशानुसार मुंबईतील मोर्चा वीर जिजामाता उद्यानापासून निघून आझाद मैदानापर्यंत पोहोचणार आहे.

नाशिक : राज्यातील सकल मराठा समाजातर्फे मुंबईत ९ आॅगस्ट क्रांतिदिनी काढण्यात येणाºया मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, मोर्चात सहभागी होण्याचा मार्ग व मोर्चेकºयांसाठी आचारसंहिता सोशल मीडियातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नकाशानुसार मुंबईतील मोर्चा वीर जिजामाता उद्यानापासून निघून आझाद मैदानापर्यंत पोहोचणार आहे.कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्याकांडाच्या घटनेचा निषेध, मराठा आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील मागण्यांसाठी मराठी क्र ांती मोर्चातर्फे राज्यातील विविध जिल्ह्णांमध्ये मराठा समाजाने ऐतिहासिक मोर्चे काढले आहेत. या सर्व मोर्चांचा शेवट मुंबईत ९ आॅगस्टला क्रांतिदिनी होणार आहे. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे. मुंबईतील मराठा मोर्चासाठी महामार्गाने मुंबईत येणारे मोर्चेकरी व रेल्वेमार्गे येणारे मोर्चेकरी यांच्यासाठी वाहनतळ व थांब्यांचा नकाशा जाहीर करण्यात आला आहे. या न काशानुसार भायखळा येथील वीर जिजामाता उद्यान येथून ६ किमी अंतर चालून मोर्चा आझाद मैदानापर्यंत पोहोचणार आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाºया वाहनांना वडाळा परिसरातील बीपीटी आरसीडी यार्ड व इस्टर्न एक्स्प्रेस वेला लागून ए, बी, सी, डी सिमेंट शेड भागात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सिमेंट शेडकडे जाण्यासाठी इस्टर्न एक्स्प्रेस वेवरून मोर्चासाठी येणाºया वाहनांना भक्तिपार्क येथून एक्झिट घ्यावी लागणार आहे. खासगीवाहनांनी येणाºया मोर्चेकºयांना वाहनतळावर वाहने लावून रेल्वेने वीर जिजामाता उद्यानापर्यंत पोहोचता येणार आहे. मोर्चात सहभागी होणाºयांसाठी सूचनाअनोळखी वस्तूला हात लावू नये, अशी वस्तू आढळल्यास पोलीस अथवा स्वयंसेवकांच्या नजरेस आणून द्यावी.संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.मूक मोर्चा असल्याने कोणीही जाताना अथवा येताना घोषणाबाजी करू नये.सोबत येणाºया सर्व सहकाºयांनी ड्रायव्हरसह साथीदारांचे मोबाइल नंबर नोंदवून घ्यावेत.मोर्चातील साहित्य टी-शर्ट, टोप्या योग्य रीतीने परिधान कराव्यात. झेंडे, स्टिकर, नामफलक, घोषणाफलक सर्वांना दिसतील असे असावे.मोर्चात सहभागी होणाºया प्रत्येकाने स्वत:चे जेवण, पाणी व छत्री, रेनकोट सोबत आणावे.मधुमेह, रक्तदाब किंवा अन्य आजारग्रस्त मोर्चेकºयांनी त्यांची औषधे व ओळखपत्र सोबत बाळगावे.मोर्चेकºयांनी शक्यतो रेल्वेने प्रवास करावा. महामार्गाने येणाºया मोर्चेकºयांनी वाहने सावकाश चालवावी.