शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सनातनच्या यादीतील नावे जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:49 IST

नाशिक : विचारवंतांच्या मारेकऱ्यांचे सनातनशी संबंध उघड झाले आहेत. मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाबाबत मौन बाळगून आहेत. सनातन कोणता कट आखत होते व कोणत्या मोर्चात ते बॉम्बस्फोट घडविणार होते याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे करावा, अशी मागणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

ठळक मुद्देजयंत पाटील : विभागीय संविधान बचाव यात्रेत मागणी

नाशिक : विचारवंतांच्या मारेकऱ्यांचे सनातनशी संबंध उघड झाले आहेत. मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाबाबत मौन बाळगून आहेत. सनातन कोणता कट आखत होते व कोणत्या मोर्चात ते बॉम्बस्फोट घडविणार होते याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे करावा, अशी मागणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या विभागीय यात्रेच्या निमित्ताने आयोजित ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रमात पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात संवैधानिक मुद्द्यांना हरताळ फासला जात असून, मनुवादी विचारांना सरकारकडूनच प्रोत्साहन दिले जात आहे. देश एकसंघ ठेवण्यासाठी ज्या घटनेचा आधार आजवर घेतला गेला, ती घटनाच जाळून टाकण्याचे पाप याच सरकारच्या काळात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे घटना जाळणाºयांवर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही की त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आलेले नाही याचाच अर्थ मनुस्मृतीकडे पुन्हा एकवार वाटचाल करण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडू लागली आहेत. सरकारच्या विरोधात बोलणाºयांचे आवाज बंद केले जात आहेत. प्रा. कुलबुर्गी, गौरी लंकेश, कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या त्याचेच द्योतक असून, पाच वर्षांनंतर या साºया हत्यांमध्ये सनातन संस्थेचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली असली तरी, त्यांचे खरे बोलविता धनी वेगळेच आहेत. आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री या प्रश्नावर काहीच बोलत नाही, असा आरोपही त्यांनी केला. सध्याचे सरकार फक्त सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत असून, स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे अल्पमतातील सरकार दोन वेळेस पडले परंतु त्यांनी कधीही सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला नाही. त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेत पाच किलोमीटर पायी चालणाºया नरेंद्र मोदी यांनी अटलजींच्या जीवनातील पाच स्वभाव वैशिष्ट्ये जरी अंगीकारली तरी पाच किलोमीटर चालून मिळणाºया समाधानापेक्षा सव्वाशे करोड जनतेच्या मनाचे समाधान होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.छगन भुजबळ सिद्धूच्या पाठीशीनवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीवरून निर्माण झालेल्या गदारोळावर भुजबळ यांनी भाष्य केले. कांदा, साखर जे काही असेल ते पाकिस्तानातून आयात करणारे सरकार सिद्धूच्या भेटीवरून केवढा गजहब करीत आहेत, असा सवाल केला. ‘समोर भेटला की प्रत्येकाला मार मिठी, मग समोरच्याने मारो ना मारो’ अशा शब्दात मोदी यांचे नाव न घेता भुजबळ यांनी, हे वाट वाकडे करून पाकिस्तानला गेले तर चालते मग सिद्धू गेला तर चुकले कोठे, असा सवाल केला.